सत्यशोधक नेहमीच जागरूक असतो

मला माझा हाच फोटो माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो . खरा इतिहास शोधण्यासाठी व्यक्ती ने नेहमी जागरूक असलं पाहिजे . हा फोटो काढण्याआधी आणि इथे भेट देण्याआधी जे माझ्या सोबत झाले होते ते मी कधीही विसरणार नाही . आणि माझ्या भावासारख्या प्रताप मित्राला तर कधीच विसरणार नाही . त्याने तर मला म्रुत्यु च्या दाढेतून बाहेर काढले होते. लेणी पाहण्यासाठी चा उत्साह आणि आनंद पाहून माझा मित्र प्रताप याला घेऊन आम्ही कराडच्या परिसरातील लेणी आगाशिवनगर याठिकाणी भेट देण्यासाठी निघालो . आधी जखिणवाडी ,नांदलापूर पुर्वीचे नालंदा पुर याठिकाणी भेट देऊन नंतर चचेगाव,आगाशिवनगर मधील लेण्यांना भेट द्यायचे आम्ही ठरवले . सकाळी सकाळी आईची माया जाताना पोटभरून जेवण केले . पण सोबत दही भरपूर खाल्ले . पाणी पिले . आणि आम्ही त्याठिकाणी आलो । जखीणवाडीच्या डोंगराच्या खाली आम्ही आमची टुविलर लावली . आणि आता डोंगरावर चढायचे . डोंगर भरपूर उंच आता काय खरं नाही . पण मनातील जिज्ञासा, आनंद ,उत्साह बघून उंची कमी वाटू लागली . डोंगर चढायला सुरुवात गेली . मला पाच मिनीटाला दम लागायचा . आणि मी थांब...