सत्यशोधक नेहमीच जागरूक असतो




माझा अस्तित्वाचा प्रवास
【सत्यशोधक महेश शिंदे】

📸 मला माझा हाच फोटो माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.
खरा इतिहास शोधण्यासाठी व्यक्ती नेहमी जागरूक असलं पाहिजे.


हा फोटो काढण्याआधी आणि इथे भेट देण्याआधी जे माझ्या सोबत झाले होते ते मी कधीही विसरणार नाही.
आणि माझ्या भावासारख्या प्रताप मित्राला तर कधीच विसरणार नाही.
त्याने मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते.


🛕 लेणी शोधयात्रा

लेणी पाहण्याचा उत्साह आणि आनंद पाहून, मी आणि माझा मित्र प्रताप कराडच्या परिसरातील आगाशिवनगर येथील लेण्यांना भेट देण्यासाठी निघालो.

👉 आधी आम्ही जखिणवाडी, नांदलापूर (पूर्वीचे नालंदापुर/नालंदा पुर) येथे गेलो.
👉 नंतर चचेगाव, आगाशिवनगर येथील लेण्यांना भेट द्यायचे ठरवले.

सकाळी आईच्या मायेनं पोटभर जेवण, सोबत दही, पाणी घेऊन आम्ही निघालो.
जखिणवाडीच्या डोंगराखाली टुव्हिलर लावली आणि मग डोंगर चढायला सुरुवात केली.


🏔️ डोंगर चढाई

डोंगर उंच होता. मला पाच मिनिटाला दम लागायचा, मी थांबायचो, पाणी प्यायचो.
घामेघूम झालो. हृदयाची धडधड वाढली होती.
प्रताप मात्र निवांत चढत होता.

शेवटी वर पोहोचलो आणि लेणी पाहून समाधान मिळालं.
पण थकव्याने मी म्हणालो –

“मला जरा धाप लागली आहे… धडधड होत आहे.”

मग आम्ही समोरच्या लेण्यात विश्रांतीसाठी गेलो.


⚡ मृत्यूशी सामना

अचानक मला चक्कर आली. उठताना मी खाली पडलो.
डोळ्याच्या वर जोरात मार लागला. मी बेशुद्ध झालो.

जेव्हा शुद्ध आली तेव्हा –
➡️ माझा मित्र प्रताप मला कृत्रिम श्वास देत होता.
➡️ छातीवर दाब देत होता.
➡️ घाम पुसत होता.
➡️ अधूनमधून रडण्याचा आवाज दाबत होता.

त्यावेळी लेण्यात असलेल्या आर्कियॉलॉजीच्या सिक्युरिटीने साखर व पाणी दिले.
थोड्या वेळाने मला उलटी झाली आणि सकाळचे खाल्लेले सगळं बाहेर पडलं.
पंधरा मिनिटांनी मी सावरलो. पुन्हा जाणवलं की आपण इथे लेण्या पहायला आलो आहोत.


🌟 शिकलो ते धडे

मित्र हे भावापेक्षाही श्रेष्ठ असतात.
नात्यापेक्षा मैत्रीचं नातं मस्त असतं.
संकल्प आणि चिकाटी असेल तर कितीही संकटे आली तरी संकल्प पूर्ण होतो.

मनाने ठरवलं तर शरीरसुद्धा साथ देतं.


🏛️ पुढचा प्रवास

नंतर मी एकट्यानेही अनेक लेण्या पाहिल्या.
डॉक्टरकडे तपासणी केली – सर्व नॉर्मल.
कोलेस्टेरॉल नॉर्मल.
व्यायाम सुरू केला.

👉 छोट्या छोट्या कामांमुळे शरीर फिट राहतं.


🩹 त्या दिवसाची खूण

आजही हा फोटो झूम करून पाहाल, तर डोळ्याच्या वरच्या जखमेवर पिवळी हळद लावलेली दिसते.
हीच मला माझ्या “सत्यशोधक” प्रवासाची आठवण करून देते.


【सत्यशोधक महेश शिंदे】



Comments