सत्यशोधक नेहमीच जागरूक असतो
✨ माझा अस्तित्वाचा प्रवास ✨ 【सत्यशोधक महेश शिंदे】 📸 मला माझा हाच फोटो माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. खरा इतिहास शोधण्यासाठी व्यक्ती नेहमी जागरूक असलं पाहिजे. हा फोटो काढण्याआधी आणि इथे भेट देण्याआधी जे माझ्या सोबत झाले होते ते मी कधीही विसरणार नाही. आणि माझ्या भावासारख्या प्रताप मित्राला तर कधीच विसरणार नाही. त्याने मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. 🛕 लेणी शोधयात्रा लेणी पाहण्याचा उत्साह आणि आनंद पाहून, मी आणि माझा मित्र प्रताप कराडच्या परिसरातील आगाशिवनगर येथील लेण्यांना भेट देण्यासाठी निघालो. 👉 आधी आम्ही जखिणवाडी, नांदलापूर (पूर्वीचे नालंदापुर/नालंदा पुर) येथे गेलो. 👉 नंतर चचेगाव, आगाशिवनगर येथील लेण्यांना भेट द्यायचे ठरवले. सकाळी आईच्या मायेनं पोटभर जेवण, सोबत दही, पाणी घेऊन आम्ही निघालो. जखिणवाडीच्या डोंगराखाली टुव्हिलर लावली आणि मग डोंगर चढायला सुरुवात केली. 🏔️ डोंगर चढाई डोंगर उंच होता. मला पाच मिनिटाला दम लागायचा, मी थांबायचो, पाणी प्यायचो. घामेघूम झालो. हृदयाची धडधड वाढली होती. प्रताप मात्र निवांत चढत होता. शेवटी वर पोहोचलो आणि लेणी प...