येराडवाडी पाटण बुद्धीस्ट लेणी Yeradwadi Patan Buddhist Leni

 


नमो बुद्धाय 

मित्रांनो 

मी महेश शिंदे , कराड तालुक्यात आगाशिवनगरच्या डोंगरावर हिनयान पंथाच्या लेण्या आहेत हे मोठं वैशिष्ट्य आहे कराडचे . 


एखादे विद्यापीठ आहे आणि आजुबाजुला त्या विद्यापीठांचे उपकेंद्र आहेत त्याप्रमाणेच मला कराडच्या आसपास लेण्या सापडतात का हा ध्यास लागला . 


हिनयान हा सर्वात जुना म्हणजे साडेतीन हजारो वर्षे जुना आणि सर्वात पहिला बौद्ध धम्माचे आचरण करणारा आणि प्रचार करणारा जुना पंथ .  ह्या पंथाच्या लेण्या कराडच्या जवळपास पाटण तालुक्यात येराडवाडी आणि येरफळे ह्या गावात सापडतात । येराडवाडी हे गाव पाटण ला जाताना लागते . तिथे जाण्यासाठी रस्ता आहे . गाडी 

बाईक जाते . पण पायथ्याला तुम्ही गाडी घेऊन जाउ शकता . थोडे चालावे लागते . आणि तुम्ही वर मुख्य ध्येयापर्यंत पोहचू शकता. 


अत्यंत निसर्ग रम्य परिसरात ह्या लेणी आहेत . जशी मळवली लेणी आहे तश्याच  पण लेण्या ह्या कमी प्रमाणात आहे . ज्या आहेत त्यामध्ये वैदिक सनातनी संस्कृती ने आक्रमण केलेल्या आहेत . त्यामध्ये स्तुप बहुतेक फोडून. त्याजागी पिंड ठेवली आहे . बाजूला   एक खडकात कोरलेली भिक्षूंसाठी ध्यान करण्यासाठी खोली आहे . त्याच्या बाजूला एक मुजलेली लेणी आहे . त्याच्या बाजूला पाण्याचा खडकात कोरलेला रांजण आहे . आजुबाजुला लेणी असण्याची शक्यता आहे . कारण त्या खूप प्राचीन असल्याने काही लेण्या मुजलेल्या स्वरूपात आहेत ..आणि ज्या आहेत त्यामध्ये वैदिकी करण केले आहे . संपूर्ण ब्राह्मणांच्या. ताब्यात ही लेणी आहे . असं वाटतं . 



भारताचा खरा इतिहास हा डोंगरातच सापडतो . कराडच्या आगाशिवनगरच्या लेण्या  विद्यापीठ असेल आणि येराडवाडी येरफळे हे उपकेंद्र आणि संस्थेप्रमाणे  असतील . 



भारताचा सत्य  इतिहास 

हाच आहे .आम्हाला जमेल तसे आम्ही आपल्या समोर ठेवू . 


धन्यवाद 


जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 


【सत्यशोधक महेश शिंदे】


























Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम