Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड
नमस्कार मित्रांनो , मी महेश शिंदे आपल्या समोर बौद्ध संस्कृती चे पुन्हा एकदा पुरावे घेऊन आलोय .
मी कराड पासून पाच किलोमीटरवर राहतो . आपल्या कराड मध्ये आगाशिव नगर ,जखिण वाडी आणि नांदलापुर ह्या भागात बौद्ध विप्पस्नना केंद्र म्हणजे बुद्धकालीन लेणी आहेत . आणि ह्याचे च कुतूहल घेऊन आम्ही आणि आमचे मित्र प्रताप लोंढे आज कराडला बुद्ध लेणीला भेट दिली .
आम्ही ह्या परिसरात असणाऱ्या 56 लेण्यात भेट दिली आणि तिथे असलेल्या चैत्य, धम्म चक्र, सम्राट अशोक चे सिंह स्तंभ , आणि स्तुप ह्यांच्या भेटी दिल्या .

आस्ट्रेलियन आर्किओलोजीस्ट आपल्या The hidden ancient history of india ह्या पुस्तकात पुस्तकाचा संदर्भ देतो आणि सांगतो कराड परिसरात एकुण 108 बौद्ध लेणी आहेत . खरं तर आम्ही स्वतः हुन ज्यावेळी ह्या परिसरात भेट दिली त्यावेळी आम्हाला आगाशिव चा डोंगर पुर्ण बुद्ध लेण्यांनी भरलेला दिसला .
ह्या लेणी 2000 साल पुर्वी कोरलेल्या आहेत . इथे प्रत्येक लेण्यात मला स्तुप सापडले , सम्राट अशोक चे धम्म 26 आऱ्याचे चक्र सापडले . स्वतः जाऊन बघण्याची मजाच खुप निराळी असते मित्रांनो . ना तहान लागते ना भुक फक्त वेड्यासारखा शोधत राहायचं .
आम्ही आज 58 लेण्यांनी भेठ दिली अजून 50 लेणी पाहायचे राहीलेत . अश्या मिळून 108 लेणी आहेत .
आजचा सातारा कराड भागातील आमचा परिसर बुदध विचारांचा होता ,हे समजल्यावर आणि पाहिल्यावर खुप अभिमान वाटला . हो आम्ही आपण सर्वजण श्रमण संस्कृती चे वारसदार होतो आणि आहोत .
आगाशिवनगर येथील लेणी क्रमांक ४७ मध्ये सापडलेला लेख ह्याचा माझे मित्र लेणीसंवर्धक रवींद्र मनोहर (मुंबई) ह्या मित्राने स्पष्ट करून सांगितला आहे . त्याचे वर्णन मी खाली करीत आहे . आणि प्रथमतः मी त्याचे आभार मानतो
""" मी बुद्ध लिपी बद्दल जाणून घेऊ इच्चीतो . मला वरील बुद्ध धम्म लिपी कराड येथील अगाशिवनगर लेणीमध्ये सापडली आहे . ह्यामध्ये काय लिहले आहे हे मी जाणून घेऊ इच्चीतो , आपली जरा मदत व्हावी ""
" 𑀕𑁄𑀧𑀸𑀮 𑀧𑀼𑀢𑀲 𑀲𑀖𑀫𑀺𑀢𑀲 𑀮𑁂𑀡 𑀤𑁂𑀬 𑀥𑀬 "
==> "गोपाल पुतस सघमितस लेण देय धम "
मराठी मध्ये भाषांतर ===> " गोपाल याचा मुलगा संघमित्र याने लेण्यांचे धम्म दान दिले " .
आता हा गोपाळ व्यापारी असू शकतो कदाचित राजा सुद्धा असू शकतो . पण मात्र ह्यावर मी स्पष्ट करू शकतो हि "कराड" नगरी बौद्ध विचारांची होती आणि बौद्ध विचार सर्वांच्या घराघरात होते . लोक मी ज्यावेळेस हे सर्व पुराव्यानिशी घेऊन येतो त्यावेळेस आपल्यातलेच काही हरामखोर माझी जात शोधतात कि हा , बौद्ध असेल , किंवा मुस्लिम असेल .
अश्या कर्मठांना मला एक सांगायचे आहे खरा इतिहास सर्वांसमोर आणणे म्हणजे पूर्वजानी लादलेली गुलामी अस्वीकार करून स्वातंत्र्यात जगण्याची मजाच खूप वेगळी आहे . मी ब्राह्मणी मानसिकतेतून बाहेर आलोय . माझे नास्तिक म्हणून पण नामकरण झाले आहे . आजच्या पिढीला खरा इतिहास स्वीकारायचा नाही आहे . त्यांना कट्टरतावादी जीवन जगायचे आहे . त्यातून फक्त आणि फक्त अज्ञान आणि अराजकता पसरणार आहे .

गौतम बुद्धाला स्वीकारणारा तरुण कधीही हिंसेच्या मार्गावर जात नाही किंवा दुसऱ्यांना दुःख पोहचवीत नाही . आमच्या कराडला बौद्ध लेणी आहेत त्यात मला खूप अभिमान आहे . मला फक्त एकच सांगायचे आहे कराडकरांना , आपले कराड पूर्वी शांततेच्या विचारांवर जगत होते आता काही त्यात कट्टरवादी विचारवंत घुसले आहे जे लोकांच्यात रोष पैदा करून समाजासमाजमध्ये भेद पाडत आहेत . अश्या लोकांना ओळखा जे कट्टरवादी आहेत आणि त्यांना आपला देश शांततेत कसा होता हे सांगण्याचा प्रयत्न करा . नाहीतर आपला देशाचा कधी सिरिया होइल समजणार नाही

महेश अशोक शिंदे
7057801271
7057801271

Very nice...
ReplyDeleteGood
ReplyDeleteसर आपल्या जिज्ञासू वृत्ती बद्दल अभिमान वाटतो, खूप छान अभ्यासुवृत्ती आहे आपली. आपण कार्ला लेणी ला नक्की भेट द्यावी.
ReplyDeleteDhanyawaad SIR .
Deleteaaple naav kalel ka ??
Delete