Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड
🌸 नमस्कार मित्रांनो 🌸
मी महेश शिंदे – आपल्या समोर पुन्हा एकदा बौद्ध संस्कृतीचे पुरावे घेऊन आलो आहे.
📍 मी कराडपासून फक्त ५ किमीवर राहतो. आपल्या कराडमध्ये आगाशिवनगर, जखिणवाडी आणि नांदलापुर या भागात बुद्धकालीन विपश्यना केंद्र – बौद्ध लेणी आहेत.
आज मी आणि माझे मित्र प्रताप लोंढे यांनी कराड येथील बौद्ध लेणींना भेट दिली.
🏛️ आमची भेट
✅ ५६ लेण्यांना भेट दिली
✅ चैत्यगृह, धम्मचक्र, सम्राट अशोकाचे सिंहस्तंभ व स्तूप पाहिले
✅ आगाशिव डोंगर बौद्ध लेण्यांनी समृद्ध असल्याचे अनुभवले
📖 Australian Archaeologist यांच्या The Hidden Ancient History of India या पुस्तकात कराड परिसरात एकूण १०८ बौद्ध लेणी असल्याचा उल्लेख आहे.
आज आम्ही ५८ लेणींना भेट दिली – अजून ५० बाकी आहेत.
🕰️ इतिहासाची साक्ष
🔹 ही लेणी सुमारे २००० वर्षांपूर्वी कोरलेली आहेत.
🔹 प्रत्येक लेण्यात स्तूप, अशोकधम्माचे २६ आर्यांचे चक्र कोरलेले दिसते.
🔹 स्वतः डोळ्यांनी पाहण्याची अनुभूती – तहान-भूक विसरून फक्त शोधाचा उत्साह!
✍️ आगाशिवनगर लेणी क्रमांक ४७
येथील शिलालेख माझ्या मित्राने रवींद्र मनोहर (मुंबई) यांनी वाचला –
👉 ब्राह्मी लिपी :
𑀕𑁄𑀧𑀸𑀮 𑀧𑀼𑀢𑀲 𑀲𑀖𑀫𑀺𑀢𑀲 𑀮𑁂𑀡 𑀤𑁂𑀬 𑀥𑀬
👉 मराठी भाषांतर :
“गोपाळ याचा मुलगा संघमित्र याने लेण्यांचे धम्म दान दिले.”
यावरून स्पष्ट होते की कराड नगरी बौद्ध विचारांची नगरी होती.
🚩 काही कट्टर लोकांसाठी उत्तर
जेव्हा मी पुरावे दाखवतो, तेव्हा काही जण “हा बौद्ध असेल, मुस्लिम असेल” म्हणून जात काढतात.
त्यांना माझे एकच सांगणे आहे –
👉 खरा इतिहास उघड करणे म्हणजे पूर्वजांनी लादलेली गुलामी नाकारून स्वातंत्र्यात जगणे.
👉 मी ब्राह्मणी मानसिकतेतून बाहेर आलो आहे.
👉 मी नास्तिक आहे, पण मला अभिमान आहे की आपण श्रमण संस्कृतीचे वारसदार आहोत.
✨ आजचा संदेश
गौतम बुद्धाला स्वीकारणारा तरुण कधीही हिंसेचा मार्ग निवडत नाही.
आपला कराड भाग एकेकाळी शांततेचा व बौद्ध विचारांचा केंद्रबिंदू होता.
⚠️ आज काही कट्टरवादी समाजात भेद पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ओळखा!
नाहीतर, आपला देशही एक दिवस सीरियासारखा होऊ शकतो.
🌿 अभिमानाने सांगतो
👉 कराड = बुद्धभूमी
👉 कराड = शांततेचा वारसा
👉 कराड = बौद्ध संस्कृतीचे जीवंत पुरावे
✍️ – महेश शिंदे

7057801271

















































Very nice...
ReplyDeleteGood
ReplyDeleteसर आपल्या जिज्ञासू वृत्ती बद्दल अभिमान वाटतो, खूप छान अभ्यासुवृत्ती आहे आपली. आपण कार्ला लेणी ला नक्की भेट द्यावी.
ReplyDeleteDhanyawaad SIR .
Deleteaaple naav kalel ka ??
Delete