माझ्या हिंदू बांधवांचे माझ्या बाबतीतले विचार
माझ्या तथाकथित हिंदू बांधवांचे सर्व सामान्य प्रश्न आणि त्याची उत्तरे ■सिद्धार्थ गौतम बुद्ध कितीही तत्त्वज्ञानी पुरुष असले तरीही ते आमच्या देवापेक्षा श्रेष्ठ नाहीत . ==>माझे उत्तर तथागतांचा उपदेश आहे ,व्यक्ती जातीने, वर्णाने श्रेष्ठ होत नाही तर कर्माने, विचाराने आणि आचरणाने श्रेष्ठ होतो. ■सिद्धार्थ गौतम हे आधी हिंदू होते ==>माझे उत्तर हिंदू धर्माचे संस्थापक कोण ?? तथागत हिंदू होते याचा एक तर पुरावा तिपीटक किंवा ब्राह्मण धर्म ग्रंथात लिखित स्वरूपात आहे का.?? हिंदू होते तर कोणत्या देवाची आराधना करत होते ?? त्यांच्या कोणत्या उपदेशामध्ये त्यांनी हिंदू देव देवतांचे समर्थन दिले आहे . स्वतः तथागतांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे . ते यांना व्याक्रुत म्हणून धारण करा असे म्हणतात . कारण देव आहे किंवा नाही यावरुन व्यक्ती चे कल्याण होणार नाही तर . चांगल्या प्रयत्नात, चांगल्या विचारांनी व्यक्ती चे कल्याण होते . ■सिद्धार्थ गौतम बुद्ध हे विष्णु चे अवतार आहेत . ==>माझे उत्तर मुळात विष्णू ची कल्पना ही बौद्ध धम्मातून आलेली कॉपी पेस्ट मुद्रा आ...