माझ्या हिंदू बांधवांचे माझ्या बाबतीतले विचार

 माझ्या तथाकथित हिंदू बांधवांचे सर्व सामान्य प्रश्न आणि त्याची उत्तरे


■सिद्धार्थ गौतम बुद्ध कितीही तत्त्वज्ञानी पुरुष असले तरीही ते आमच्या देवापेक्षा श्रेष्ठ नाहीत . 


==>माझे उत्तर तथागतांचा उपदेश आहे ,व्यक्ती जातीने, वर्णाने श्रेष्ठ होत नाही तर कर्माने, विचाराने आणि आचरणाने श्रेष्ठ होतो. 


■सिद्धार्थ गौतम हे आधी हिंदू होते 


==>माझे उत्तर 

हिंदू धर्माचे संस्थापक कोण ?? तथागत हिंदू होते याचा  एक तर पुरावा तिपीटक किंवा ब्राह्मण धर्म ग्रंथात लिखित स्वरूपात आहे का.??

हिंदू होते तर कोणत्या देवाची आराधना करत होते ?? त्यांच्या कोणत्या उपदेशामध्ये त्यांनी हिंदू देव देवतांचे समर्थन दिले आहे . स्वतः तथागतांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे . ते यांना व्याक्रुत म्हणून धारण करा असे म्हणतात . कारण देव आहे किंवा नाही यावरुन व्यक्ती चे कल्याण होणार नाही तर . चांगल्या प्रयत्नात, चांगल्या विचारांनी व्यक्ती चे कल्याण होते . 


■सिद्धार्थ गौतम बुद्ध हे विष्णु चे अवतार आहेत . 


==>माझे उत्तर 


मुळात विष्णू ची कल्पना ही बौद्ध धम्मातून आलेली कॉपी पेस्ट मुद्रा आहे . तथागतांचे परिनिर्वाण अवस्थेतील घेतलेली मुद्रा आहे . 

तथागतांचे विचार पचत नसतील त्यांच्या विचारांचा विरोध करता येत नसेल तर त्यांचे विरोधक त्यांना ईश्वर अवतार ,विष्णू अवतार घोषित करत . ज्याने त्यांचे खरे कार्य समाजापासून लांब राहील . 


■सिद्धार्थ गौतम बुद्ध हे भगवान म्हणजे ईश्वर अवतार होते 


==>माझे उत्तर 

चुक. ते आपल्या सारखे हडामांसाचे व्यक्ती होते . ज्यांनी अभ्यास करून बुद्धी वापरुण ,चांगल्या पद्धतीने जे खऱ्या ला खरं माणले , तर्क ,चिकित्सा ,जिज्ञासा याला महत्त्व दिले . आणि माणवतावादी विचार समाजापुढे ठेवला . ते एक महान पुरुष आहेत 


■गौतम बुद्ध हे नास्तिक होते . 


==>माझे उत्तर 

चुक, सिद्धार्थ गौतम बुद्ध हे वास्तविक होते . 

जे पाहीलं त्याला पाहीलं , ऐकलं त्याला ऐकलं आणि जाणलं त्याला जाणलं असं समजणारे , 

बुद्धी ,तर्कशुद्ध ,चिकित्सा ,जिज्ञासू महापुरुष होते . कसलीही जबरदस्ती न करणारे , शांत , माणवतावादी , कसलाही भेद न करणारे ,क्रांतिकारी पुरुष होते . 


■गौतम बुद्ध हे ब्राह्मणांना माणत होते 


==>माझे उत्तर ,चुक उलट त्यांनी प्रत्येक वेळी त्यांना सुधरविण्यासाठीच प्रयत्न केले . म्हणून च तर प्रत्येक सुत्त ब्राह्मणांना लागू होते आणि नावे सुद्धा त्यांची च आहेत . पण त्यांनी स्वतः चा विकास करून घेतला नाही . ही त्यांची चुकी.


■तु गौतम बुद्धाचे उपदेश सांगतो तु बौद्ध आहे का??

==>माझे उत्तर

नाही ,मी जेव्हा पासून या विचारधारेत आलो त्यानंतरही धर्म आणि जात दोन्ही बाजूला काढून टाकले आहे. मी एक सर्व सामान्य व्यक्ती आहे . ज्याचे मनपरिवर्तन झाले आहे. 


■तु गौतम बुद्ध यांचे विचार आचरणात आणतो का ??

==>माझे उत्तर ,हो 


मी सुरुवातीच्या काळात गौतम बुद्ध जाणायच्या आधी एकाही पंचशीलाचं पालन करत नव्हतो ,मी  वायफाय वाया गेलो होतो, वाईट मार्गाने जात होते . त्याचा मला पश्चाताप ही झाला होता . 


■तु फक्त गौतम बुद्ध यांचेच विचार सांगतोस ,तुला इतर ही महापुरुषांच्या बाबतीत काय वाटते 


==>माझे उत्तर 


मी सर्वांना माणतो 

तथागत गौतम बुद्ध यांच्या पासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अहिल्यामाई ,जिजाऊ, सावित्री माई,छत्रपती संभाजी महाराज सर्व बहुजन महापुरुष ,तसेच माणवतावादी पैगंबर, येशू यांना सुद्धा माणतो। फक्त काल्पनिक धोतांड सोडून.


■तुला काय काम धंदा आहे की नाही ,तु फक्त विडीओ पोस्ट करतोस 


==>माझे उत्तर 


मी नोकरी सोबत , घरकामात सुद्धा मदत करतो, जसं की पडलेली भांडी, कपडे धुऊन टाकतो. ही (पत्नी) नोकरी वरुन यायच्या आधी च

दररोज रात्री साठी भात,आमटी, जेवण बनवतो . केरसुणी ने साफसफाई करुन,ओल्या फडक्याने फरशी पुसून घेतो . मुलीला खेळवतो . आणि मोकळ्या वेळेस पुस्तके वाचतो . त्यातलं महत्त्वाचे काय वाटले की त्याच वेळेस विडीओ बनवतो. म्हणून सकाळी थोडं उशिरा उठतो.


★तर माझ्या हिंदू बांधवांनो मला जातीचे, धर्माचे लेबल लावणे बंद करा,किंवा समजणे बंद करा   . 


★ज्यावेळेस तुम्ही असे बोलता ,त्यावेळी मला फरक पडत नाही ,मी लगेच ओळखतो की समोरचा व्यक्ती माणसिक बौद्धिक दारिद्र्यात आहे की नाही . मी एक सत्यशोधक आहे . 

जे जे सत्य आहे ,माणवतावादी आहे त्याचा अभ्यास करून माणवतावादी माणवतेचं कल्याण व्हावे यासाठी मी हे सर्व समोर मांडणार . भलेही कोणी माझा गळा चिरून टाकण्याचा प्रयत्न केला तरीही यातून माघार नाही. 


【जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 】


√सत्यशोधक महेश शिंदे

Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम