कान्हेरी बुद्ध लेणी भेट
#भाग पहिला कान्हेरी लेणीला भेट देण्याचा हा दुसरा प्रसंग ,११ डिसेंबर ला लोनाड ला जाण्याचा प्लॅन केला ,थेरवादि बुद्ध लेण्या पाहण्यासाठी आणि वेसांतर राजा चे बौद्ध शिल्प जाणून घेण्यासाठी विखरणकर सर यांचा फोन आला , कि मला त्या जातक कथा समजून घ्यायच्या आहेत , ठीक आहे मी म्हणालो नक्कीच तुमच्यासाठी मी तिथे येईल , विखरणकर सर मला न्यायला माझ्या घरापर्यंत आले , बाप माणूस वयाने एवढे मोठे होते हे मला माहितीच नव्हते , अभ्यासू वृत्ती , नेहमी काही तरी नवीन शोधण्याच्या प्रयत्नात होते , मी म्हणालो हे तर सत्यशोधक आहेत , मी ३२ वयाचा सर ६० वयाचे ,आपण एक तर वयाने सामान किंवा लहान असलेल्या व्यक्तीला आपला मित्र मानतो , पण सर तर एवढे मोठे असून हि नंतर मला माझ्या मित्रांसारखे वाटू लागले ,लोनाड लेणी पाहता पाहता सर म्हणाले कि मी उद्या कान्हेरी ला जाणार आहे सुरज सर सोबत आहेत येणार आहेत का ??? मी म्हणालो 'हो नक्कीच'. मला हि ओढ निर्माण झाली , सुरज सर आहेत म्हणजे आता नवीन माहिती मिळणार आणि आपल्या ज्ञानात हि भर पडणार . त्याच दिवशी सुरज सर यांचा फोन आला कि कान्हेरी ला येतायत का ?? मी म्हणालो नक्कीच . मी हि ...