कुंडल सांगली जैन लेणी
🌄 कुंडल-सांगलीच्या जैन-बौद्ध लेण्या : एक सत्यशोधक प्रवास 🌄
रविवारी मी आणि प्रताप लोंढे कुंडलजवळील लेण्या पाहायला गेलो. वेळ कमी असल्याने सगळ्या लेण्या नीट पाहता आल्या नाहीत, पण लक्षात आलं की त्या फक्त बौद्धच नाहीत तर जैन परंपरेच्या लेण्या सुद्धा आहेत.
ज्या प्रकारे बौद्ध लेण्यांवर अतिक्रमण झाले आहे, तसंच जैन लेण्यांवरही इतर संस्कृतींचे सावट पसरलेले दिसते. बौद्ध समुदाय आता जागरूक होत असला तरी, जैन समाजाने आपली श्रमण परंपरा जवळजवळ विसरली आहे. परिणामी निगंठ नटपुत्त (महावीर) यांचे विचारही वैदिक परंपरेखाली झाकले गेले आहेत.
🔎 माझ्या गावाच्या आसपासची ठिकाणीसुद्धा या संस्कृतीशी जोडलेली वाटतात –
-
मुंडे : मुंडन करणारे लोक (भिक्खूंचा संदर्भ)
-
गोटे : केस काढलेला (चमन गोटा)
-
वनवास माची : संन्यास घेणारे स्थळ
-
नांदलापूर : नालंदापूर (नालंदा विद्यापीठाची आठवण)
हि सर्व गावे एकेकाळच्या बौद्ध संस्कृतीचेच द्योतक आहेत.
👉 लवकरच मुंडे भागातील प्राचीन दिगंबर महावीर मूर्ती व तिचे अवशेष शेअर करणार आहे.
✍️ सत्यशोधक – महेश शिंदे
Comments
Post a Comment