कोंडिवते लेणी (महाकाली Caves) – अंधेरी, मुंबई
🪨 कोंडिवते लेणी (महाकाली Caves) – अंधेरी, मुंबई 📅 दिनांक : २६-०६-२०२२ 👥 मी आणि माझा नातेवाईक मित्र रोहन यांनी कोंडिवते लेणीला भेट दिली. 👉 माझी ही तिसरी भेट होती. ✨ कोंडिवते लेण्यांचे वैशिष्ट्य येथे हीनयान (स्थविरवादी पंथ) चे स्तूप पाहायला मिळतात. स्तूप म्हणजे काय❓ भगवान गौतम बुद्ध यांपूर्वीपासून एखाद्या व्यक्तीच्या अस्थींवर स्तूप बांधून त्याचे पूजन केले जाते. महापरिनिब्बान सुत्ता मध्ये भगवान बुद्ध भिक्खूंना सांगतात – "माझ्या मृत्यूनंतर माझ्या अस्थींवर स्तूप बांधा." म्हणून अशा स्तूपाला शारीरिक स्तूप म्हणतात. कोंडिवते लेण्यांमध्ये असलेल्या स्तूपांवर – छत्र, यष्टी, हर्मिका, अंड, प्रदक्षिणा हे सर्व घटक स्पष्ट दिसतात. 🏛️ लेण्यांचा समूह साधारण १५ ते १९ लेण्यांचा समूह आहे. यामध्ये हीनयान व महायान पंथाचा प्रभाव दिसतो. प्रवेशद्वारावर पिंपळाकृती कमानी आहेत. 👉 बौद्ध धर्मात पिंपळ वृक्ष म्हणजेच बोधी वृक्ष . तथागत गौतम बुद्धांना वैशाख पौर्णिमेला गया (बिहार) येथे याच वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. 🔎 तुलना आणि अभ्यास लोणाड (भ...