कोंडिवते लेणी (महाकाली Caves) – अंधेरी, मुंबई
🪨 कोंडिवते लेणी (महाकाली Caves) – अंधेरी, मुंबई
📅 दिनांक : २६-०६-२०२२
👥 मी आणि माझा नातेवाईक मित्र रोहन यांनी कोंडिवते लेणीला भेट दिली.
👉 माझी ही तिसरी भेट होती.
✨ कोंडिवते लेण्यांचे वैशिष्ट्य
-
येथे हीनयान (स्थविरवादी पंथ) चे स्तूप पाहायला मिळतात.
-
स्तूप म्हणजे काय❓
भगवान गौतम बुद्ध यांपूर्वीपासून एखाद्या व्यक्तीच्या अस्थींवर स्तूप बांधून त्याचे पूजन केले जाते. -
महापरिनिब्बान सुत्ता मध्ये भगवान बुद्ध भिक्खूंना सांगतात –
"माझ्या मृत्यूनंतर माझ्या अस्थींवर स्तूप बांधा."
म्हणून अशा स्तूपाला शारीरिक स्तूप म्हणतात.
कोंडिवते लेण्यांमध्ये असलेल्या स्तूपांवर –
-
छत्र, यष्टी, हर्मिका, अंड, प्रदक्षिणा
हे सर्व घटक स्पष्ट दिसतात.
🏛️ लेण्यांचा समूह
-
साधारण १५ ते १९ लेण्यांचा समूह आहे.
-
यामध्ये हीनयान व महायान पंथाचा प्रभाव दिसतो.
-
प्रवेशद्वारावर पिंपळाकृती कमानी आहेत.
👉 बौद्ध धर्मात पिंपळ वृक्ष म्हणजेच बोधी वृक्ष.
तथागत गौतम बुद्धांना वैशाख पौर्णिमेला गया (बिहार) येथे याच वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले.
🔎 तुलना आणि अभ्यास
-
लोणाड (भिवंडी), सांगली, कुकटोळी, कवठे महांकाळ येथील लेण्यांप्रमाणे येथेही पिंपळाकृती कमानी आहेत.
-
लोणाडमध्ये मात्र स्तूपाचे अवशेष नाहीत, अतिक्रमणामुळे नष्ट झाले असावेत.
-
लोणाडच्या प्रवेशद्वारावर राजा वेसांतर जातक कथा कोरलेल्या आहेत.
-
या लेण्या भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ३०० वर्षांनी कोरलेल्या असाव्यात.
🌸 सप्तबुद्ध
मोठ्या स्तूपाजवळ कमळावर पद्मासनस्थ बुद्ध आहेत.
मला येथे एकूण सात बुद्ध (सप्तबुद्ध) पाहायला मिळाले –
१) विप्पशी
२) शिखी
३) क्रकूच्छंद
४) कनकमुनि
५) कश्यप
६) विश्वभू
७) गौतम बुद्ध
👉 दिघ निकाय, महापदान सुत्ता मध्ये यांचा उल्लेख आहे.
तथापि, मानवी इतिहासावर प्रभाव टाकणारे एकमेव होते – तथागत गौतम बुद्ध.
🗿 शिल्पसाम्य
-
लेण्यांच्या उजव्या बाजूस चौरंगावर बसलेले बुद्धाचे शिल्प आहे.
-
हे शिल्प अगदी कान्हेरी (बोरीवली, मुंबई) येथील शिल्पासारखेच दिसते.
-
म्हणजे हे शिल्प त्याच कलाकारांनी कोरलेले असावे.
📜 थेरवाद आणि महायान परंपरा
-
येथे थेरवादि स्तूप, महायानी बुद्धशिल्प, अभयमुद्रेतील बुद्धमूर्ती दिसतात.
-
काही भग्न स्तूपांचे अवशेष मला छतावर दिसले.
-
त्या विटा साधारण १५०० वर्षे जुन्या वाटतात.
-
हा स्तूप अरिहंत भिक्खूंच्या अस्थींवर बांधलेला शारीरिक स्तूप असावा.
⚠️ आजची परिस्थिती
दुर्दैवाने…
-
आज या पवित्र स्थळी अतिक्रमण झालेले आहे.
-
लव्हर्स पॉइंट, कचरा, घाणेरडे प्रकार सुरू आहेत.
-
आर्किओलॉजी विभाग नावापुरता आहे, फक्त पैसे उकळण्यासाठी.
👉 कधी एकेकाळी येथे अरिहंत भिक्खूंचा निवास होता, आज तीच जागा अपवित्र झाली आहे.
🙏 तथागत, ह्या अज्ञान लोकांना माफ कर.
🔔 निष्कर्ष
कोंडिवते लेणी म्हणजे –
-
थेरवाद व महायान पंथाचा संगम
-
स्तूप, सप्तबुद्ध, शिल्पकला आणि इतिहास यांचा अनमोल ठेवा
ही पवित्र जागा पुन्हा जागृत व्हावी, संवर्धन व्हावे, हीच खरी अपेक्षा.
✍️ सत्यशोधक महेश शिंदे
📞 7057801271
















































































































































Comments
Post a Comment