लेण्याद्री कपिचीत लेणी
सर्वांना क्रांतिकारी जय भीम !! ✊ लेण्याद्री भेट – एक अनुभव 📅 रविवारी, ५ तारखेला 🛕 संयुक्त लेणी परिषद व अशोक वॉरियर्स यांच्या माध्यमातून थेरवादी लेण्यांना – लेण्याद्री, जुन्नर – भेट देण्याची संधी मिळाली. खूप दिवसांपासून लेण्याद्रीला जाण्याचा बेत होता. शेवटी या प्रवासातून तो पूर्ण झाला. प्रवासाची सुरुवात मी सकाळी कल्याण येथून अशोक वॉरियर्स सोबत निघालो. मिनी बसमध्ये साधारण २५ जणांचा समूह होता – समविचारी बांधव व भगिनी. बस मध्ये प्रज्योत कदम सर, संतोष वाघमारे सर, अनिल जाधव सर, प्रभाकर जोगदंड सर असे ओळखीचे लेणी संवर्धक होते. त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली, यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार 🙏. लेणी संवर्धनाचा उद्देश संयुक्त लेणी परिषदेच्या माध्यमातून सर्व लेणी संवर्धक, अभ्यासक, संशोधक, तसेच फुले–शाहू–आंबेडकर विचारांचे मित्र एकत्र आले. मुख्य उद्देश होता – लेणी जागृती करणे सर्वांना एकत्र आणणे अतिक्रमण विरोधात लढा देणे एकजूट निर्माण करणे या सत्रात अतुल भोसेकर सर यांनी मार्गदर्शन केले. लेण्याद्रीकडे प्रवास कल्याण → मुरबाड → माळशेज घाट → जुन्नर → लेण्याद्...