लेण्याद्री कपिचीत लेणी
सर्वांना क्रांतिकारी जय भीम !! ✊
लेण्याद्री भेट – एक अनुभव
📅 रविवारी, ५ तारखेला
🛕 संयुक्त लेणी परिषद व अशोक वॉरियर्स यांच्या माध्यमातून थेरवादी लेण्यांना – लेण्याद्री, जुन्नर – भेट देण्याची संधी मिळाली.
खूप दिवसांपासून लेण्याद्रीला जाण्याचा बेत होता. शेवटी या प्रवासातून तो पूर्ण झाला.
प्रवासाची सुरुवात
मी सकाळी कल्याण येथून अशोक वॉरियर्स सोबत निघालो. मिनी बसमध्ये साधारण २५ जणांचा समूह होता – समविचारी बांधव व भगिनी.
बस मध्ये प्रज्योत कदम सर, संतोष वाघमारे सर, अनिल जाधव सर, प्रभाकर जोगदंड सर असे ओळखीचे लेणी संवर्धक होते.
त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली, यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार 🙏.
लेणी संवर्धनाचा उद्देश
संयुक्त लेणी परिषदेच्या माध्यमातून सर्व लेणी संवर्धक, अभ्यासक, संशोधक, तसेच फुले–शाहू–आंबेडकर विचारांचे मित्र एकत्र आले.
मुख्य उद्देश होता –
-
लेणी जागृती करणे
-
सर्वांना एकत्र आणणे
-
अतिक्रमण विरोधात लढा देणे
-
एकजूट निर्माण करणे
या सत्रात अतुल भोसेकर सर यांनी मार्गदर्शन केले.
लेण्याद्रीकडे प्रवास
कल्याण → मुरबाड → माळशेज घाट → जुन्नर → लेण्याद्री
🌄 घाटातून जाताना निसर्गरम्य दृश्ये अंगावर शहारे आणणारी होती.
तीन तासांचा प्रवास करून आम्ही लेण्याद्रीच्या पायथ्याशी पोहोचलो. तिथे परभणीचे पांडुरंग सरकते सर, अनिल सर, प्रभाकर सर, प्रज्योत सर यांच्यासोबत चढाई सुरू केली.
उत्साह इतका होता की तहान, भूक व थकवा विसरून गेलो.
भेटी आणि अनुभव
लेण्यांच्या परिसरात भरपूर गर्दी होती. माझे डोळे फेसबुकद्वारे ओळख झालेल्या समविचारी व्यक्तींना शोधत होते.
तेव्हा कुमार सर, अतुल भोसेकर सर, सिद्धार्थ कसबे सर, अमोल बोर्डे सर, सुनील खरे सर यांची भेट झाली.
अतुल सरांना भेटल्यानंतर असा भास झाला जणू मी भिक्खू महाकाश्यप यांनाच भेटत आहे.
अभ्यास आणि मार्गदर्शन
लेण्यात प्रवेश करून –
-
पंचशील वंदना झाली
-
जेवणानंतर परिचय व उद्देश सांगण्यात आला
-
लेणी, स्तूप, शिलालेख, थेरवादी प्रतीके पाहिली
👉 लेण्याद्रीला “कापिचीत लेणी” असेही म्हणतात.
हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे संघाराम असून ३०–४० लेणी एका रांगेत पाषाणात कोरलेली आहेत.
शिलालेखांमधून दातृत्वाची माहिती मिळते.
यावेळी संतोष वाघमारे सरांनी शिलालेख वाचून दाखवला. तसेच सिद्धार्थ कसबे सर व खरात सर यांचीही भेट झाली.
अतुल भोसेकर सरांचे मार्गदर्शन अतिशय मोलाचे ठरले.
वैयक्तिक भावना
📸 सर्वांसोबत छायाचित्रे घेतली.
📖 “जातिव्यवस्थेचे निर्मूलन” हे पुस्तक भेट मिळाले.
खूप चांगला दिवस गेला – अभ्यास, मार्गदर्शन, समविचारी मित्रांच्या भेटी आणि समाधान याने मन भरून गेले.
प्रेरणा
जसे हुएन त्संग म्हणतात –
“पामेर पर्वत जरी अंगावर कोसळला तरीही मी तथागतांच्या पवित्र भूमीला जाण्याचा निश्चय सोडणार नाही.”
त्याचप्रमाणे –
जोपर्यंत शरीरात रक्त आहे तोपर्यंत मी बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव तयार राहीन.
शेवटचा संदेश
कसलाही मान–सन्मान, अहंकार, पुरस्कार यांची अपेक्षा न ठेवता…
द्वेष, गट–तट, भेद, स्वार्थ बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लेणी जागृती व प्रबोधन केले पाहिजे.
यातच तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा सन्मान आहे.
✍️ सत्यशोधक महेश शिंदे
📞 7057801271




































































































Comments
Post a Comment