[ कार्ला लेणी ]

मित्रानो , मी महेश शिंदे नमो बुध्दाय [ कार्ला लेणी ] २०१६ ला माझे लग्न झाले आणि मी बंधनात अडकलो , लग्नानंतर पत्नीच्या नोकरी च्या कारणाने लोणावळा इथं ट्रैनिंग साठी तिला सोडण्यासाठी लोणावळा याठिकाणी जायचा योगायोग आला , नुकताच लग्न झालेला मी पत्नीचा आग्रह, घरी परतण्याच्या आधी लोणावळ्यामधे चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन जावे . मी हि ठरवले ठीक आहे हीची इच्छा पूर्ण करावी . नुकताच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा [बुद्ध आणि त्याचा धम्म ] हे पुस्तक वाचलेला मी . लोणावळ्याच्या परिसरात कारल्याला बौद्ध कालीन लेणी आहेत आणि आपण कधीना कधी तरी पाहायच्या अशी माझ्या मनात सुद्धा इच्छा होती . तिला म्हणालो ठीक आहे आपण जाता जाता अति प्राचीन [बुद्ध लेणी कार्ला लेणी ] पाहायला जायचे त्या ठिकाणी एकविरा आईचे देऊळ आहे . पण तिला बुद्ध लेणी आहेत हे माहितीच नव्हते . ती खुश झाली आणि माझ्या मनात चिकित्सा , तर्क , जिगन्यासु वृत्ती चा कल्लोळ माजला . लोणावळा पासून दहा किलोमीटर अंतरावर ह्या लेणी आहेत , साध्या गाड्या हि...