हीनयान म्हणजेच थेरवादी पंथाच्या बौद्ध लेणी आणि स्तूप . (ठिकाण : कुकटोळी , कवठे महांकाळ , मिरज , सांगली )
जुना पन्हाळा हीनयान म्हणजेच थेरवादी पंथाच्या बौद्ध लेणी आणि स्तूप . (ठिकाण : कुकटोळी , कवठे महांकाळ , मिरज , सांगली ) काही दिवसांपूर्वी मी आणि माझे मित्र प्रताप लोंढे यांनी एक न्युज वाचली होती कि , मिरज येथील इतिहासकारांना सांगली , कर्नाटक , आणि आंध्रप्रदेश सीमेलगत काही जुन्या लेणी सापडल्याची नुकतीच बातमी वाचली , आम्ही ठरवलं कि तिथे कधीना कधी तरी भेट द्यायची आणि लोकांना माहिती पोहचवायची , म्हणून मी आणि माझे बंधू प्रताप लोंढे आम्ही दोघांनी तिथे भेट देण्याचा विचार केला . मी कल्याण हुन कराडला माझ्या गावी आलो . आल्यानंतर रविवारी तिथे जाण्याचा आम्ही विचार केला . आमचे काही समविचारी मित्र संभाजी ब्रिगेड चे कार्याध्यक्ष राहुलराज कांबळे आणि शिव ,फुले , शाहू , आंबेडकर यांच्या विचारांचे मित्र संतोष माने यांना घेऊन जायांचा प्लॅन आम्ही तयार केला , जेणे करून समविचारी मित्रांची भेट होईल आणि एकमेकांचे विचार समजतील . सर्वात पहिल्यांदा प्रताप आणि मी, माझ्या सासुरवाडी वरून तासगाव या ठिकाणी जाण्यासाठी निघालो , राहुल सर आणि संतोष सर हे आधीच १ तास आधी...