हीनयान म्हणजेच थेरवादी पंथाच्या बौद्ध लेणी आणि स्तूप . (ठिकाण : कुकटोळी , कवठे महांकाळ , मिरज , सांगली )

 जुना पन्हाळा 


हीनयान म्हणजेच थेरवादी पंथाच्या बौद्ध लेणी आणि स्तूप . (ठिकाण : कुकटोळी , कवठे महांकाळ , मिरज , सांगली )


काही दिवसांपूर्वी मी आणि माझे मित्र प्रताप लोंढे यांनी एक न्युज वाचली होती कि , मिरज येथील इतिहासकारांना  सांगली , कर्नाटक , आणि आंध्रप्रदेश सीमेलगत काही  जुन्या लेणी सापडल्याची नुकतीच बातमी वाचली , आम्ही ठरवलं कि तिथे कधीना कधी तरी भेट द्यायची आणि लोकांना माहिती पोहचवायची , म्हणून मी आणि माझे बंधू प्रताप लोंढे आम्ही दोघांनी तिथे भेट देण्याचा विचार केला . मी कल्याण हुन कराडला माझ्या गावी आलो . आल्यानंतर रविवारी तिथे जाण्याचा आम्ही विचार केला . 


आमचे काही समविचारी मित्र संभाजी ब्रिगेड चे कार्याध्यक्ष राहुलराज कांबळे आणि  शिव ,फुले , शाहू , आंबेडकर यांच्या विचारांचे मित्र संतोष माने  यांना घेऊन जायांचा प्लॅन आम्ही तयार केला , जेणे करून समविचारी मित्रांची भेट होईल आणि एकमेकांचे विचार समजतील . 


सर्वात पहिल्यांदा प्रताप आणि मी, माझ्या सासुरवाडी वरून तासगाव या ठिकाणी जाण्यासाठी निघालो , राहुल सर आणि संतोष सर हे आधीच १ तास  आधी  तिथे पोहचले होते , आम्हाला थोडा उशीर झाला .   त्यांची माफी मागत मी कराड वरून रेठरे हरणाक्ष ते तासगाव असे टोटल ४० किमी चा प्रवास करत तासगाव सांगली च्या दिशेने निघालो . रस्त्याला थोडी वर्दळ होती तासगाव ला जाण्याच्या रस्त्यावर थोडे कामकाज चालू होते आम्हाला  तासगाव ला   २.३० वाजले . 


तिथे तासगाव गणपती मंदिर मध्ये राहुल सर आणि संतोष माने सर यांची भेट झाली . तासगाव चे गणपती मंदिर नीट व्यवस्थित पहिले . त्या मंदिरांवर काही 

बौद्ध पंथाच्या  ध्यानस्थ असलेल्या मुर्त्या पाहायला मिळाल्या . ह्या मुर्त्या आणि मंदिर महायानी परंपरेच्या वाटत होत्या .  आणि ते मंदिर अलीकडच्या काळातील वाटत होते ,ते मंदिर १२ शतकानंतरचे वाटत होते . यासाठी जास्त अभ्यास हवा त्यामुळे केवळ तर्काच्या आधारावरच मी बोलत आहे . 


तिथून पुढे आम्ही राहुल सर आणि संतोष माने सर यांचा निरोप घेतला 

काही कारणास्तव ते आमच्या सोबत येऊ शकले नाही , पुढे आम्ही तासगाव वरून कवठे महांकाल असा प्रवास करायचा विचार केला , 


आता वाजले होते ३.५० आणि आम्ही अजूनही तासगाव मध्येच होतो , सावळी वरून माळगाव आल्यावर माझ्या जुना मित्र 

दिगंबर पाटील याला फोन केला तो तिथलाच होता त्याला विचारले कि उंदरोबा , गिरीलिंग , जुना पन्हाळा कुठे आहे जिथे लेणी सापडतात 

तो म्हणाला तुम्ही खंडेराजुरी करत करत सरळ कुकटोळी ला या तिथे दक्षिणेला डोंगर आहे . 



तासगाव वरून सरळ कुकटोळी म्हणजे


 तासगाव --> सावळी ---> मालगाव --->खंडेराजुरी ---->कुकटोळी ---> गिरीलिंग ,जुना पन्हाळा असे अंतर आहे 


तासगाव वरून ते ४२ किमी अंतर आहे . 


आता विचारत विचारत आम्हाला ४. १५ झालेल्या होत्या . आम्ही कुकटोळी च्या दिशेने चाललो , काही धनगर समाजातील लोक दिसत होते रस्त्याला , 

काही कन्नड

 खाली कर्नाटक जवळ आहे . 


मनात उत्सुकता होती कधी एकादा  पाहतोय , खूप चिकित्सा हुरहूर लागली होती , प्रताप गाडी चालवत होते , असे करत करत शेवटी आम्ही कुकटोळी ला पोहचलो . ५. १५ झाल्या होत्या . 


पश्चिमेला सूर्य दादा त्यांचे काम करत होते , अंधार येऊ लागला होता , एक व्यक्ती भेटला त्यांनी तिथे कसे पोहचायचं याबद्दल सांगितले ते म्हणाले डोंगरवाडी वरून लवकर पोहचाल गाडी जाते वर , पण आम्ही गिरीलिंग मंदिराकडे जायचा विचार केला ,


रास्ता थोडा कच्च्या आहे , चढ आहे हळू हळू सावकाश गाडी घेऊन तुम्ही गिरीलिंग मंदिर पर्यंत पोहचू शकता . 

आम्ही आमची बाइक गिरीलिंग मंदिराच्या पार्किंग पाशी लावली . 


तिथल्या पुजारी ना विचारले कि स्तूप आहेत का , ते म्हणाले तिथे जाऊ नका तिथे साप आहेत . यांची सवय  आहे काही बुद्ध पुरावे मिळाले कि लोकांना तिथे जाऊ नका म्हणून भीती घालायची , आम्ही दुर्लक्ष्य केले . आणि आम्ही चाललो त्या लेणी शोधायला ५.४५ झाले 


खूप उशिरा पोहचलो म्हणून मन अस्वस्थ होते , आता अंधार पडतो कि काय , आपण एवढ्या लांब आलोय आपल्याला लेणी पाहायला मिळतायत कि नाही 

या मुळे मन उद्विग्न झाले होते , पण मनात जिद्ध , चिकाटी , चिकित्सा असताना कपटी माराला आमच्या मनावर  विजय मिळवता आला नाही . आम्ही पहिल्या तीन लेण्या पर्यंत पोहचलो . रात्री ७ ला त्या पठारावर संपूर्ण अंधार  आम्ही त्या जुन्हा पन्हाळावर कसलाही विचार न करता , माराचा पराभव करता . 


तिथे आधी भेट दिलेल्या मंडळींनी पांढऱ्या रंगाच्या  बाण स्वरूपात  खुणा काढल्या आहेत ज्याने एखादा सत्यशोधक सत्य शोधात आलाच तर त्याला ते पाहायला मिळेल . 

संपूर्ण मैदान आहे  आणि लेण्या   घळीत आहेत 

आम्ही पहिल्या तीन पाहिल्या  आणि नंतरच्या तीन ,

 पहिल्या लेण्यांमध्ये 

विहार बघायला मिळाले , आत काही स्तूपाचे मोडलेले अवशेष पाहायला मिळतात . 


पहिल्या तीन लेणी ह्या पाहायला मिळाल्या ,  ३ * ३ च्या लेणी पाहायला  मिळतात . आत मध्ये ध्यानस्थ खोली आहेत , स्तूपाचा भाग संपूर्ण पडलेला आहे . 


पुढल्या लेण्यांच्या आत मध्ये स्तूप पाहायला मिळतात .


स्तूपाची माहिती माझ्या व्यक्तिगत अभ्यासानुसार  -->



स्तूपाचा भाग काही कोसळला आहे , थेरवादी म्हणजेच हीनयान या अतिप्राचीन बौद्ध पंथाचे स्तूप आहेत , 


त्या स्तूपाला छत्र नाही , यष्टी नाही ,

त्या स्तूपाला वेदिका नाही आहे


हर्मिका आहे ,अंड आहे   , 

प्रदक्षिणा आहे , 

जर हा स्तूप भाजे लेणी मध्ये असलेल्या  स्तूपा  सोबत तुलना केल्यास समान वाटतो ,  फक्त काही भाग नाही आहेत , भाजे लेणीच्या स्तूप वर  हर्मिका , अण्ड ,वेदिका  पाहायला मिळते .  इथे जुना पन्हाळा लेणी मध्ये या गोष्टी पाहायला मिळत नाही , 


हा स्तूप मी दिलेल्या प्रत्येक लेणी भेट आणि स्तूप यांच्या सोबत तुलना केल्यास तो खूप जुना आणि दुर्मिळ वाटतो . कराड च्या जखीण वाडी अगाशिवनगरच्या लेणी आणि स्तूप यांच्या आधीच्या काळातील वाटतो , तो थेरवादी पंथाचा आहे , सम्राट अशोक यांच्या नंतरच्या काळातील वाटतो आहे ,  या यामध्ये कुठेहि शिल्प , शिलालेख , पेंटिंग, बुद्धमूर्त्या सापडत नाहीत . 


पण इथे स्तूप सापडतो . तोही थेरवादी भाजे , कोंडाणा , जखीणवाडी कराड यांच्या सारखा स्तूप सापडतो .  

१०१% इथे बुद्ध विचार अस्तित्वात होता , कालांतराने तो परिवर्तित झाला आहे , आणि मूळ विचार धारा संपली आहे . 


पूर्वी जो प्राचीन मार्ग होता यावर बौद्ध , जैन लेणी सापडतात . 


कराड जखीणवाडी ---> थेरवादि बौद्ध लेणी 

ताकारी , कुंडल ---->जैन लेणी 

तासगाव ---> बौद्ध /जैन मंदिर 

कुकटोळी --> बौद्ध लेणी 


दोन हजार वर्षांपूर्वी या ठिकाणी बुद्ध विचार अस्तित्वात होता याचे हे पुरावे , सन्नाती कर्नाटक मध्ये सम्राट अशोक यांचे भेटी दिल्याचे  , शिलालेख , शिल्प सापडली आहेत , 



दोन हजार वर्षांपूर्वी इथल्या  छन्नी हातोड्ड्याने पाताळाला  आकार देऊन त्यात लेणी , स्तूप बांधून 


बुद्धं सरणं गच्छामि  , 

धम्मं सरणं गच्छामि,

संघं सरणं गच्छामि 

हा   विचार इथल्या बहुजनांना दिला होता . 



महत्वाचे ज्यांना इथे भेट द्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर कसे पोहचू याचा प्रयत्न करावा  , आम्ही उशिरा पोहचलो , पण तुम्ही अशी चूक करू नका . 

लवकर पोहचा  , सुरक्षित आहे , संपूर्ण व्यवस्था करून बुद्धाचा खरा इतिहास  सदाचारी मार्गाने जाऊन लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा . 


धन्यवाद प्रताप लोंढे 

धन्यवाद राहुलराज कांबळे ,

धन्यवाद संतोष माने ,

धन्यवाद दिगंबर पाटील , 



सत्यशोधक महेश शिंदे 


७०५७८०१२७१ /7057801271





















Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम