हुयन त्संग
इसवी सण ४०० ते ६०० शतकातली गोष्ट आहे , तंग राजवट चीन वरती राज्य करीत होती , ह्या राजवटीत असलेला एक व्यक्ती गोबी चे वाळवंट तुडवून , पावसाचा , उन्हाचा , हिवाळ्याचा ,थंडीचा विचार न करता करता पायी चालत , तथागत गौतम बुद्धांचे जीवन , साहित्य आणि भारताचा बुद्धमय इतिहास जाणून घेण्यासाठी एवढ्या उत्कंठेने तो भारताकडे येऊ लागतो . वाटेत हजारो संकटे येतात , वादळे येतात सर्व परिस्थितीचा काहीही विचार न करता . मला फक्त बुद्ध जाणून घायचे आहेत ह्या चिकाटीने तो भारतात येऊ लागतो . चीन मध्ये “लोयांग” ह्या शहरात त्याचा जन्म झालेला होता . घराचे सर्व शिक्षण क्षेत्रात होते , दोन भावंडे होते . आणि त्याची अठरा वयातच बुद्ध भिक्षु म्हणून उपसंपदा झाली होती . चीन मध्ये राहणारा हा व्यक्ती सोमालिया चे वाळवंट गोबीचे वाळवंट पायी तुडवून येतो ,त्याच्या सोबत त्याचे साथीदार पण होते पण त्यातले काहीजण थकून मरण पावले आणि काहीजण घरी परत निघून आले . वाटेत काही चोर लुटारू त्यांना लुटण्यासाठी येत पण ते मी एक बौद्ध भिक्षु आहे असे सांगून ते त्यांना सोडून देत . असे करत करत ते पामेर जवळ आले , एका राजाने त्याला बंदी बनवले , पण तो बौद...