PandavLeni Nashik Caves
नमस्कार माझ्या मित्रांनो, मी नवीन एक पोस्ट घेऊन आलोय त्या पोस्ट मध्ये मी महाराष्ट्र आधी बुद्ध मय होता आणि सनातन वैदिक ब्राह्मण विचार वंत आपल्या महापुरषांचा इतिहास कसा बदलतात आणि आपल्याच लोकांना आपल्या विरोधात कसे उभे करतात ह्याचे भक्कम पुरावे घेऊन आलोय .
भावांनो तथागत गौतम बुद्धांनी चाळीस वर्षे चारीका केली न थकता दमता लोकांना सदाचार शिकविला . आष्टांगिक मार्ग सांगितला . मानवी दुःख दुर कसे करता येईल ह्याचा विचार केला . अश्या ह्या महापुरुषाचे गोडवे जेवढे गाल तेवढे कमीच.
काही लोक माझ्या समोर त्यांना उलट सुलट बोलतात यामधून बोलणाऱ्याचे आचरण लक्षात येईल त्यात गौतम बुद्ध यांचा एकही गुण कमी होणार नाही . भारत देशाला एकमेव मिळालेला हा दागिणा होता .
"सर्वोत्तम भुमीपुत्र" - तथागत गौतम बुद्ध
कालच मी नाशिक येथे त्रिरश्मी लेणी पहायला गेलो होतो . नाही मनात कोणत्याही जातीचा माज , नाही मनात कोणत्याही धर्माचे समर्थन . कारण गौतम बुद्ध बोलत होते ज्याला जातीचा माज आहे ती जात सदैव मागे राहते नष्ट होते असाच विचार करून निस्वार्थी पणे मी तथागत गौतम बुद्ध यांच्या ओढित मी पांडवलेणी ह्या ठिकाणी गेलो . कसारा इगतपुरी आणि नंतर नाशिक पांडवलेणी असा टुर होती एकटाच गेलो कोणाचा विचार न करता .
नाशिक पांडव लेणी मुळात पांडवलेणी बोलणं कितपत योग्य आहे . सर्व भिंतीवर पाषाणात चाळीस फुटी गौतम बुद्ध कोरलेला असताना हे लोक ह्या भागात पांडवलेणी नाव देतातच कसे . ज्यांनी पण पांडव लेणी नाव देऊन गौतम बुद्धांचा इतिहास पुसण्याचे काम केलय त्या मुर्ख लोकांना माझा सलाम . हा खोडसाळ काम शुंग वंशावळीनेच केला आहे . हे नाव देऊन हा भाग पांडवांचा होता असे भासवण्याचा खुळा प्रकार लक्षात येतोय . असो मला पाच पांडवांपैकी एकाही अर्जुन भीम नकूल ह्याचा पुरावा सापडला नाही . सापडल्या त्या भल्या मोठ्या प्रमाणात गौतम बुद्ध यांच्या मुर्त्या . त्या पण असंख्य . देखण्या, कोरीव .
चैत्य सापडले भिक्खूच्या खोल्या ध्यान करण्यासाठी स्तुप भले मोठे खांब त्या वर धम्म चक्र चैत्य आणि कोरीव काम .
वाघ, सिंह ,हत्ती ,अस्वल आणि बैल रेडा ह्यांचा पण समावेश आहे . प्राणी मात्रांवर हे लोक प्रेम करायचे असे समजून येईल . एका लेणी त मला मांजर सुद्धा कोरलेली दिसली . असणारच गौतम बुद्ध यांचा ऊपदेशच होता सर्वांना प्रेम करा . सर्वांना जखमा होतात . आणि सर्व जण मरण पावणार आहे . बौद्ध राजे प्राणी मात्रांवर प्रेम करायचे हे कळून येईल .
आता ह्या लेण्या इसवी सन . Before Christ 76 सालातील आहेत. अशोक च्या काळातील आहेत . मला वाटते ज्या ज्या राजवट राज्य करून गेली त्या त्या राजवटीने प्रत्येक एक लेणी बनवली आहे .
गौतमीपुत्र सतकर्णी , छत्रप नहापना . पुलुयामी ह्या लोकांनी बनवली आहेत असे तिथे वर्णन आहे .
गौतमीपुत्र सत्कारणी हा शालीवहण म्हणजे सातवाहन चा बौद्ध राजा . सातही राजे बौद्ध होती. बुद्ध विचार बहुजन प्रत्येक पुरुष स्री तळागाळातील व्यक्ती पर्यंत जावा ह्या साठी त्यांनी हे लेणी कोरलेली आहेत . गौतमी पुत्र सतकर्णी ह्याचा इतिहास पुन्हा बदललेला आहे . तो छत्रप नहापना ह्या बौद्ध राजाला हरवून होता . एक बौद्ध राजा बौद्ध राजाच्या विरोधात कसा काय असु शकतो . इथे गौतमीपुत्र सत्कारणी सनातन वैदीक विचार मानत होता असे दाखवण्याचा पुरावा नाही .
गौतमीपुत्र ह्या नावावरून लक्षात येते की भारतात मात्र्ःऊसत्ताक पद्धत होती . राज्याचा कारभार स्त्रिया चालवत . शालीवहण सातवाहन हे बौद्ध राजे होते . पुढे वैदिक सनातन शुंग राजांनी आक्रमक करून हा भाग हस्तगत केला व लेण्यात तोडफोड केली . भिक्कूंच्या कत्तल केल्या . इथे यवन म्हणजे आजचा ग्रीक लोक राजे बौद्ध विचार शिकून घेण्यासाठी येत होते ह्याचे वर्णन कार्ला लेणी मध्ये आहे . बौद्ध विचार पुर्ण आशियामध्ये होता हे पुराव्यासहीत सिद्ध होईल .ग्रीक राजा मिनिएंडर हा पुढे बौद्ध मिलिंद भिक्कू झाला .
महाराष्ट्र मध्ये बौद्ध परंपरा होती हे समजणे आणि असणे आपल्या महाराष्ट्र चे वैभव आहे . श्रमण संस्कृती चे आपण वारसदार आहोत . गौतम बुद्ध कोणत्याही एका जातीचे नव्हते ते समस्त मनुष्य जातीचे होते. प्रेम .दया करुणा ही शिकवण होती .
आपल्या भारत देशाने त्याच्या या पुत्राला त्याच्या च देशातून परका केला . इतिहास सांगितला पण तो पण कमीच . अश्या ह्या महामानवाचा इतिहास आम्ही सर्वांसमोर घेऊन येतोय .
गौतम बुद्ध बोलतात .
येही ये तस्स म्हणजे ये आणि पहा असा उपदेश त्यांचा .
टीप वरील पोस्ट अभ्यास करून लिहले ली आहे . सदर लेखक हा कोणत्याही जातीचे समर्थन करीत नाही . किंवा मानीत नाही . तो तथागत गौतम बुद्ध यांचा इतिहास सर्वांसमोर घेऊन आला आहे.
तिन गोष्टी फार काळ टिकत नाही सूर्य, चंद्र आणि सत्य .
चरथ भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय .
अतः दिपः भवः
भवतु सब्ब मंगलमय .
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
सघं शरणं गच्छामि
महेश अशोक शिंदे
7057801271
Comments
Post a Comment