Posts

कान्हेरी बुद्ध लेणी भेट

Image
🏛️ कान्हेरी लेणीला दुसरी भेट ✨ 📅 दिनांक : ११ डिसेंबर 👉 या दिवशी मूळ प्लॅन होता लोणाड लेणी पाहण्याचा – थेरवादी बुद्ध लेणी आणि वेसांतर राजा जातक शिल्प अभ्यासण्यासाठी. 📞 विखरणकर सरांचा फोन विखरणकर सरांनी मला फोन केला : "जातक कथा समजून घ्यायच्या आहेत, मला मदत करशील का?" मी लगेचच होकार दिला. सर माझ्या घरी न्यायला आले. ते वयाने मोठे (६० वर्षांचे) असूनही सत्यशोधक वृत्तीचे, नेहमी शोध घेणारे व्यक्तिमत्त्व! मला तर ते माझ्या समवयस्क मित्रांसारखेच वाटू लागले. लेणी पाहता पाहता सर म्हणाले : "मी उद्या सुरज सरांसोबत कान्हेरीला जाणार आहे, येणार का?" मी म्हणालो : "हो, नक्कीच!" 🚉 प्रवास आणि तयारी दुसऱ्या दिवशी मी व विखरणकर सर रेल्वेने बोरिवली, संजय गांधी पार्क येथे पोहोचलो. तेथून शेअर टॅक्सीने थेट कान्हेरी लेणी गाठले. त्याच वेळी अभिजित थोरात यांनाही फोन करून सोबत येण्यासाठी सांगितले. 🏞️ कान्हेरीचा अद्भुत अनुभव 👉 पश्चिम महाराष्ट्रात कान्हेरीसारखी लेणी दुसरीकडे नाहीत! हे खरेच एक बौद्ध विद्यापीठ आहे – थेरवाद व महायान परंपरेचा संगम ...

कुंडल सांगली जैन लेणी

Image
🌄 कुंडल-सांगलीच्या जैन-बौद्ध लेण्या : एक सत्यशोधक प्रवास 🌄 रविवारी मी आणि प्रताप लोंढे कुंडलजवळील लेण्या पाहायला गेलो. वेळ कमी असल्याने सगळ्या लेण्या नीट पाहता आल्या नाहीत, पण लक्षात आलं की त्या फक्त बौद्धच नाहीत तर जैन परंपरेच्या लेण्या सुद्धा आहेत. ज्या प्रकारे बौद्ध लेण्यांवर अतिक्रमण झाले आहे, तसंच जैन लेण्यांवरही इतर संस्कृतींचे सावट पसरलेले दिसते. बौद्ध समुदाय आता जागरूक होत असला तरी, जैन समाजाने आपली श्रमण परंपरा जवळजवळ विसरली आहे. परिणामी निगंठ नटपुत्त (महावीर) यांचे विचारही वैदिक परंपरेखाली झाकले गेले आहेत. 🔎 माझ्या गावाच्या आसपासची ठिकाणीसुद्धा या संस्कृतीशी जोडलेली वाटतात – मुंडे : मुंडन करणारे लोक (भिक्खूंचा संदर्भ) गोटे : केस काढलेला (चमन गोटा) वनवास माची : संन्यास घेणारे स्थळ नांदलापूर : नालंदापूर (नालंदा विद्यापीठाची आठवण) हि सर्व गावे एकेकाळच्या बौद्ध संस्कृतीचेच द्योतक आहेत. 👉 लवकरच मुंडे भागातील प्राचीन दिगंबर महावीर मूर्ती व तिचे अवशेष शेअर करणार आहे. ✍️ सत्यशोधक – महेश शिंदे 📞 ७०५७८०१२७१

जुना पन्हाळा:-हीनयान म्हणजेच थेरवादी पंथाच्या बौद्ध लेणी आणि स्तूप . (ठिकाण : कुकटोळी , कवठे महांकाळ , मिरज , सांगली )

🏞️ जुना पन्हाळा – एक सत्यशोधक प्रवास 🔸 प्रस्तावना हीनयान / थेरवादी पंथ यांचे बौद्ध लेणी आणि स्तूप हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत अनेक ठिकाणी आढळतात. अलीकडेच मिरज येथील इतिहासकारांनी काही जुनी लेणी सापडल्याची बातमी दिली होती. हे वाचल्यावर मी आणि माझा मित्र प्रताप लोंढे यांनी तिथे भेट द्यायचे ठरवले. 🔸 प्रवासाची सुरुवात मी कल्याणहून कराड गावी आलो आणि रविवारी प्रवासाची आखणी झाली. आमच्यासोबत संभाजी ब्रिगेड चे कार्याध्यक्ष राहुलराज कांबळे आणि संतोष माने (शिव–फुले–शाहू–आंबेडकर विचारांचे अनुयायी) यांना भेटण्याचे ठरले. पहिली भेट झाली तासगाव गणपती मंदिरात . तिथे मंदिरातील काही ध्यानस्थ मूर्त्या पाहता आल्या. त्या महायानी परंपरेच्या असल्याचा अंदाज आला. हे मंदिर १२व्या शतकानंतरचे वाटते. 🔸 कुकटोळीची दिशा तासगावहून पुढे जाण्याचा आमचा प्रवास : तासगाव → सावळी → मालगाव → खंडेराजुरी → कुकटोळी → गिरीलिंग / जुना पन्हाळा एकूण अंतर : सुमारे ४२ किमी . वाटेत स्थानिक मित्र दिगंबर पाटील याने मार्गदर्शन केले. सायंकाळी ५.१५ वाजता कुकटोळी येथे पोहोचलो. गिरीलिंग ...

भाजा लेणी मावळ पुणे ,लोणावळा .

Image
भाज्या लेण्यांतून बुद्धविचारांच्या शोधात... आज पुन्हा तथागत गौतम बुद्धांच्या भूतकाळाच्या शोधात मी लोणावळा-मळीवली येथील भाज्या लेण्यात भेट दिली. इतिहास सांगतो – इ.स. 627 मध्ये लोयांग (चीन) येथून ह्युएन त्संग भारतात आला. त्याला बुद्ध आणि त्यांच्या धम्मविचारांचे सखोल ज्ञान हवे होते. हुएन सांग यांचा प्रवास केला – अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मीर, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, कांचीपुरम, कोंकणपुरा, महाराष्ट्र, गुजरात, नालंदा आणि पुन्हा तक्षशिला… या संपूर्ण प्रवासात त्याने 957 बुद्धग्रंथ आणि विपुल ज्ञान गोळा केले. आणि 645 च्या काळात पुन्हा चीनला परत गेला. असंख्य संकटं, वादळं, संकटमय रस्ते ओलांडूनही तो फक्त बुद्धाच्या ज्ञानाच्या जिज्ञासेसाठी जगला. त्याची ती जिज्ञासा, त्याग आणि शोधवृत्ती मनाला भिडते. म्हणूनच मीही बुद्ध आणि त्यांच्या विचारांचा अंश माझ्यात यावा म्हणून असा शोध घेत राहतो. भरपूर अशा गोष्टी, ज्या पुस्तकात वाचता येत नाहीत त्या आपण प्रत्यक्ष अनुभवल्यावरच समजतात. 【 सत्यशोधक महेश शिंदे 】