धर्माच्या व्याख्या
महामानव डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्म ह्याबद्दल चे विचार :
बाबासाहेब
म्हणतात
जरी मी धर्माच्या
व्याख्याची निंदा करतो ह्याचा अर्थ असा नाही कि धर्माची आवश्यकता नाही आहे .
तर धर्म हि अशी
गोष्ट आहे ह्याच्या वरती सगळ्या नागरिकांची आणि सरकारांची धोरणे अवलंबून आहेत .
ते म्हणत खरा
धर्म जो आहे जो जुन्या चाली रीती , परंपरा , जातिप्रथा ,रूढी सोडून येऊन एकत्र येऊन काम करेल तोच खरा
धर्म असेल . ते ह्याबाबतीत सहमत होते कि धर्माची आवश्यकता आहे . त्यांच्या
दृष्टिकोनातून धर्मामध्ये बदल हि खूप गरजेची गोष्ट आहे .
त्यांच्या मते
धर्मात बदल करण्यासाठी आवश्यक मुद्दे हे आहेत :
१. हिंदू धर्माची
केवळ एक म्हणजे एकच मान्य केलेली पुस्तक किंवा ग्रंथ असायला पाहिजे , ज्या ग्रंथाला सारेच्या सारे हिंदू मान्य करतील
आणि स्वकारतील .
२. वेद ,पुराण आणि शास्त्र यांना पवित्र मानने हे बंद
केले पाहिजे जर ह्याचा उपयोग झाला तर त्याच्यावरती दंड ठोठावले पाहिजेत .
३. सर्वात चांगली
बाब म्हणजे हिंदूंमध्ये असलेले पुरोहितशाही म्हणजेच ब्राम्हिन शाही नष्ट करण्यात
येईल पण असे घडणे असंभव आहे त्यासाठी ब्राम्हिणशाही हि वडिलोपार्जित नसायला
पाहिजेल .
४. जो व्यक्ती
स्वतःला हिंदू समजत आहे अश्या व्यक्तीने राज्यसेवेच्या सनदी परीक्षा पास करून
पुजारी बनण्याचा अधिकार असायला हवा . म्हणजे राज्यसेवा सनदी परीक्षा पास झाल्या
नंतरच तुम्ही पुजारी बनू शकता.
५. जो व्यक्ती
राज्यसेवेच्या सनदी परीक्षा पास नसेल तो व्यक्ती पुजारी बनायच्या पात्रतेचा नसेल .
६. ज्याच्या कडे
पुजारी राज्यसेवा पास झालेली सनद नसेल तशी पदवी नसेल तर असा व्यक्ती दंड अर्थात
सजा होण्यास पात्र ठरेल
७. एखादा पुजारी
हा सरकारने नियुक्त केलेला असावा , ज्याच्याकडे
नैतिकता , आस्था आणि पूजा
ह्या गोष्टींमध्ये शासनाने सांगितलेली बंधने असावीत .
अश्या सोबत तो एक
भारतीय नागरिक असावा .
८. पुजारी
यांच्या संख्येवर शासनाचा संख्येच्या बाबतील लक्ष्य असावे . कि आता फक्त १०० च
पुजारी असायला हवे असे.
काही व्यक्तींना
ह्या गोष्टी खूप सुधारणावादी वाटत असतील
९. जेवढे नियम
इंजिनेर ,डॉक्टर ,वकील , शिक्षक त्यांच्या व्यवसायात पाळत असतील मला नाही वाटत कि पुजारी त्यांच्या
व्यवसायात एकदम कठोर नियम पाळत असतील .
१०. हिंदू धर्मा
मध्ये पुजारी चा असा व्यवसाय हा एकदम घृणास्पद
आहे , कि त्यामध्ये
पदवीची गरज नाही आहे , अटी
नाही आहेत तो फक्त ब्राम्हिन असला पाहिजेल , मग तो आजारी असो , अक्कलशून्य असो व अशिक्षित असो . धर्माचे
ठेकेदार ब्राम्हिन असणे हे चुकीचे आहे आणि अंत्यंत घृणास्पद आहे ज्याने हिंदू
धर्मात चुकीच्या चालीरीती , सामान्य जनतेची
पिळवणूक आणि फसवणूक होऊ शकते . ह्यामुळे हिंदूंची एकता कमी होऊ शकते आणि हिंदू धर्मात फूट पडू शकते .
११. पुरोहित
ब्राम्हिन वर्गाला विधेयक लावून नियंत्रित आणले पाहिजे . असे केल्यास हे लोक
सामान्य जनतेची फसवणूक आणि पिळवणूक करणार नाहीत .
आणि पुजारी
बनण्याची संधी सर्व जाती समुदायातील व्यक्तींना मिळेल .
१२. ह्या वरील
गोष्टी करून देशातील कुप्रथा बंद होतील , जातिप्रथा बंद होतील आणि ब्राम्हिणवाद , ब्राम्हिणशाही नष्ट होईल ..
१३. जो पर्यंत
भारत देशातून ब्राम्हिन वाद मिटणार नाही
तो पर्यंत हिंदू मध्ये एकी होणार नाही , ह्या साठी ब्राम्हिन समाजाकडून स्वागत झाले पाहिजे . तरच
जातिप्रथा मिटतील .
१४. देशात
समाजवाद , एकता आणायची असेल
तर ह्या देशातून शास्त्र, वेद, पुराण , ब्राम्हिन निर्मित ग्रंथ ह्या गोष्टींचा त्याग
करायला हवा. तरच ह्या देशातून जातिप्रथा निघून जातील आणि भारत महासत्ता बनेल .
Comments
Post a Comment