ब्राम्हीन ब्रम्हाच्या तोंडून जन्मला ???
ब्राम्हीन ब्रम्हाच्या तोंडून जन्मला ???
धर्मात असणाऱ्या
कमी अक्कल असलेल्या लोकांचे स्पष्टीकरण :
लोकानां तु
विवृद्ध्यर्थं मुखबाहूरूपादतः ।
ब्राह्मणं
क्षत्रियं वैश्यं शूद्रं च निरवर्तयत् ॥
(मनुस्मृति,
अध्याय 1, श्लोक 31)
ब्राह्मणोऽस्य
मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः ।
ऊरू तदस्य
यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रोऽजायतः ॥
(ऋग्वेद संहिता,
मण्डल 10, सूक्त 90, ऋचा 12)
(ब्राह्मणः अस्य
मुखम् आसीत् बाहू राजन्यः कृतः ऊरू तत्-अस्य यत्-वैश्यः पद्भ्याम् शूद्रः अजायतः
।)
(लोकानां तु
विवृद्धि-अर्थम् मुख-बाहू-ऊरू-पादतः ब्राह्मणं क्षत्रियं वैश्यं शूद्रं च निर्-अवर्तयत्
।)
शाब्दिक अर्थ:
समाज की वृद्धि के उद्येश्य से उसने (ब्रह्म ने) मुख, बाहुओं, जंघाओं एवं पैरों से क्रमशः ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तथा शूद्र का निर्माण किया ।
वरील उदाहरण
सांगतात कि ब्राम्हिन हा ब्रम्हाच्या तोंडून झालेली पैदास आहे
हि उदाहरणे आपल्या
हिंदू धर्मात असलेल्या ग्रंथातून घेतली आहेत .
विज्ञानाद्वारे
स्पष्टीकरण :
माझ्या शिकल्या
सवरलेल्या मित्रांसाठी :
आपला जन्म कसा
होतो ??? मनुष्य , प्राणी , पक्षी , कीटक , सूक्ष्मजीव यांचा जन्म कसा होतो ??? लग्न झालेल्या मित्रांना याच्या संदर्भात ज्ञान देणे म्हणजे स्वतःला मूर्ख समझणे होय ,
तरीही मला त्यांच्या
पर्यंत हि माहिती पोहचवावी वाटली .
मानव प्राण्यातील
नर जातीला पुरुष असे म्हणतात. सर्वसाधारपणे प्रौढ (३० किंवा त्यातून अधिक वय) मानव
नराला पुरुष असे संबोधले जाते. मुलगा हा सर्वनाम शब्द बाल्यावस्थेतील पुरुषांकरीता
वापरला जातो. युवक हा शब्द तरुण पुरुषांसाठी वापरला जातो ज्यांचे वय १५ ते २९
दरम्यान असते.
मानव (मनुष्य) हा
दोन पायावर चालणारा सस्तन प्राणी आहे. मानवाचा मेंदू हा प्रगत असल्यामुळे तो
पृथ्वीवरील सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे. मानव जातीत दृश्य लिंगावर आधारित
स्त्री व पुरुष असे वर्गीकरण केले जाते.
मानवजातीचा उगम २,००,००० वर्षांपूर्वी आफ्रिका खंडात झाला पण आज मानव
अंटार्क्टिका व्यतिरिक्त सर्व खंडांत आढळतो. पृथ्वीवरील मानवाची एकूण लोकसंख्या
७.२ अब्ज आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे.
मानव स्त्री व
पुरुष(अवयवांच्या नावांसहित)
मानव हा एक
बुद्धिमान प्राणी आहे.मानवाने आपल्या बुद्धीकौशल्याने पृथ्वीवर स्वर्ग निर्माण
केला आहे .ज्या प्राण्याला स्तन आहे तो सस्तन प्राणी होय.
उष्ण रक्ताचे,
पाठीचा कणा असलेले,
शरीरावर स्वेद (घाम) व
दुग्ध (दूध) ग्रंथी (स्तन) असणारे प्राणी.
हे प्राणी
जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते.
उदा. माणूस,
मांजर, वटवाघूळ
सर्व सजीवांमधे
आढळणारी प्रजनन ही एका जीवापासून नवीन जीव निर्माण होण्याची प्रक्रिया मानवातही
आढळते. या प्रक्रियेत मानवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जनुकीय द्रव्यांचे
संक्रमण होते. त्यामुळे मानवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व
गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात. प्रजननाच्या हेतून विकसित झालेल्या व
एकत्रितपणे काम करणार्या सर्व अवयवांची मिळून मानवी प्रजननसंस्था[१] बनते. काही
द्रव व संप्रेरके हे निर्जीव पदार्थही या संस्थेत सहाय्यक म्हणून काम करतात.
मानवात नर
(पुरुष) व मादी (स्त्री) अशा भिन्नलिंगी व्यक्ती असतात आणि फक्त लैंगिक प्रकारानेच
प्रजनन होते. मानवी वाढ व विकासातील पौगंडावस्थेत व्यक्तीचा पुरुष किंवा स्त्री म्हणून
वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक विकास होतो. त्यामधे लैंगिक प्रजननाला आवश्यक अवयवांचा
पूर्ण विकास होऊन व्यक्ती तरुण पुरुष किंवा स्त्री म्हणून प्रजननक्षम होते.
पुरुषाच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून पुरुष प्रजननंस्था बनते
आणि स्त्रीच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून स्त्री प्रजननंस्था
बनते.
लैंगिक प्रजनन
दोन एकगुणित
युग्मकांच्या संयोगातून द्विगुणसूत्री युग्मनज अशा जीवाची उत्पत्ति म्हणजे लैंगिक
प्रजनन होय. लैंगिक प्रजनामध्ये पुरुषात प्राथमिक शुक्रजनन पेशीच्या अर्धसूत्री
विभाजनाने[२] एकगुणित ‘पुंयुग्मक’ किंवा ‘शुक्रजंतू’ तयार होतो आणि स्त्रीमधेही
त्याचप्रमाणे प्राथमिक बीजांडजनन पेशीच्या अर्धसूत्री विभाजनाने एकगुणित
‘स्त्रीयुग्मक’ किंवा ‘बीजांड’ तयार होते व त्यांच्या संयोगाने द्विगुणसूत्री
युग्मनज (फलित बीजांड) तयार होते. या प्रक्रियेस फलन असे म्हणतात व त्यातून नवीन
मानवी जीव (गर्भ) निर्माण होतो.
शुक्रजंतू
पुरुषाचा (पित्याचा) आणि बीजांड स्त्रीचा (आईचा) जनुकीय वारसा घेऊन येतात. फलित
बीजांडात ही दोन्ही युग्मके एकत्र आल्यामुळे गुणसूत्रांच्या जोड्या आनुवंशिकतेने
आलेल्या असतात आणि जनुकांची देवाणघेवाण होऊन जनुकीय द्रव्यामध्ये विविधता येते.
यामुळे जनुकीय दोष कमी असलेला व अधिक सक्षम नवा जीव निपजतो.
पुरुषाच्या
वृषणात निर्माण झालेल्या शुक्रजंतूंचे रेताशयात पोषण होते. रेताशय व अष्टीला
ग्रंथीतील स्राव व हे शुक्रजंतू यांचे वीर्य बनते. संभोगाचे वेळी पुरुषाचे शिश्न
स्त्रीच्या योनीत प्रवेश करते व वीर्यस्खलनाचे वेळी वीर्य योनीत सोडले जाते.
त्यातील काही भाग गर्भाशयमार्गे बीजांडवाहिनीत पोचतो. बीजांडकोषातून उत्सर्जित
झालेल्या व बीजांडवाहिनीत पोचलेल्या बीजांडाशी वीर्यातील शुक्रजंतूचा संयोग होऊन
बीजांड फलित होते (फलन). फलित बीजांड (गर्भ) गर्भाशयात रुजतो व तेथे त्याची वाढ
होते (गर्भारपण). प्रसूतीच्या वेळी गर्भ गर्भाशयातून योनीवाटे बाहेर पडून बाळाचा
जन्म होतो. स्तनांतून स्रवणार्या दुधावर पुढे काही काळ त्याचे पोषण होते.
याप्रमाणे
युग्मके (शुक्रजंतू व बीजांड) निर्माण करणार्या, त्यांचे पोषण करणार्या, त्यांना एकमेकांकडे वाहून नेणार्या, त्यांना एकत्र आणणार्या, फलनानंतर नवीन जीव रुजवून त्याचे पोषण करणार्या,
त्याला बाह्य जगात तग धरू
शकेल इतक्या प्रगल्भतेच्या अवस्थेपर्यंत वाढवणार्या, त्याला योग्य वेळी बाह्य जगात सोडणार्या आणि
पुढे काही काळ त्याचे पोषण करणार्या सर्व सहभागी अवयवांची व यंत्रणेची मिळून
मानवी प्रजननसंस्था बनते.
प्रजननसंस्थेतील
हे अवयव व ही यंत्रणा पुरुष व स्त्रीमधे अर्थातच वेगवेगळी असते. तिला अनुक्रमे
पुरुष प्रजननसंस्था आणि स्त्री प्रजननसंस्था असे म्हणतात.
आता आपण मानवी पुरुष लिंगाबद्दल जाणून घेऊ
पुरुष
प्रजननसंस्था :
शुक्राणू तयार
करणे, त्यांचे पोषण
करून त्यांना कार्यक्षम राखणे, योग्य त्या वेळी
त्यांचे वहन करणे आणि समागमाच्या वेळी स्त्री जनन संस्थेमध्ये त्यांचे क्षेपण करणे
यासाठी पुरुष प्रजनन संस्था आणि त्यातील अवयव विकसित झालेले असतात
प्रजननसंस्थेमध्ये[३]
काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी (बाह्य) व काही शरीरांतर्गत असतात. तसेच त्यांच्या
विकासात व कार्यात अनेक अंतःस्रावी ग्रंथींचाही सहभाग असल्याने त्यांचाही समावेश
पुरुष प्रजननसंस्थेत होतो.
अंतर्गत पुरुष
जननेंद्रिये
वृषण
(वृषणे बाहेरून
दिसत असली तरी वृषणाची निर्मिती आणि विकास उदरपोकळीत होत असल्याने त्यांचे वर्णन
इथे केले आहे.) मानवी वृषणकोशामध्ये दोन वृषणे असतात. वृषणामधील रेतोत्पादक
नलिकांमध्ये शुक्रजनन पेशी आणि ’सर्टोली’ पेशी असतात. शुक्रजनन पेशींपासून
आद्यशुक्रजंतू तयार होतात. शुक्रजंतूंच्या पोषणासाठी व परिवहनासाठी आवश्यक द्रव
’सर्टोली’ पेशींपासून निर्माण होतो. रेतोत्पादक नलिकांमधल्या जागेतील अंतराली
ऊतकातील ’लायडिग’ पेशी ’पौरुषजन’ टेस्टोस्टेरॉन (Testosterone) या संप्रेरकाची निर्मिती करतात. याप्रमाणे
शुक्रजंतूंची निर्मिती करणारी प्रजननग्रंथी आणि टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करणारी
अंतःस्रावी ग्रंथी असे दुहेरी कार्य वृषण करते.
अधिवृषण:
वृषणाच्या मागील व वरील बाजूस अधिवृषण असते. ही घट्ट गुंडाळी केलेली लांब नलिका
असते. वृषणाच्या मागच्या भागातून बाहेर पडणार्या नलिकांतून शुक्रजंतू अधिवृषणात
प्रवेश करतात. येथे शुक्रजंतूंचा पुढील विकास होतो व ते रेतोवाहिनीत प्रवेशतात.
रेतोवाहिनी
अधिवृषणाच्या
खालच्या टोकपासून ही नलिका सुरू होते. रेताशय व अष्ठीला ग्रंथीतून पुढे गेल्यावर
तिचे स्खलनवाहिनीत रूपांतर होते. अधिवृषणामधील शुक्राणू पुढे सरकून
रेतोवाहिनीमध्ये साठून राहतात.
रेताशय
मूत्राशयाच्या
खाली, दोन्ही
रेतोवाहिन्यांच्या शेजारी दोन रेताशय असतात. वीर्याचा 70 ते 85 % भाग रेताशयातील स्रावांचा असतो. त्यामधे
प्रथिने काही उत्प्रेरके, श्लेश्म
इत्यादीबरोबर क जीवनसत्व आणि फ्रक्टोज शर्करा असते. फ्रक्टोज शुक्रजंतूंना ऊर्जा
पुरवते.
स्खलन वाहिनी:
रेताशयातून निघणारी वाहिनी त्या बाजूच्या रेतोवाहिनीला मिळून स्खलन वाहिनी बनते.
दोन्ही बाजूच्या स्खलन वाहिन्या अष्ठीला ग्रंथीत शिरून तिच्यातून जाणार्या
मूत्रवाहिनीला मिळतात. समागमाच्या वेळी स्खलनवाहिन्यांतून वीर्य मूत्रनलिकेत व
तिथून शिश्नाावाटे स्त्री जननेंद्रियामध्ये सोडले जाते.
अष्ठीला ग्रंथी
वीर्याचा 20 ते 30 % भाग अष्ठीला ग्रंथीमधील स्त्रावांचा असतो.
त्यात प्रथिने, उत्प्रेरके,
शर्करा व इतर
पदार्थांबरोबर झिंकही असते. हा स्राव आणि रेताशयातील स्राव शुक्रजंतूंबरोबर मिसळून
वीर्य तयार होते. अष्ठीला ग्रंथीमध्ये फायब्रिनोजेन हे गोठण द्रव्यही असते
मूत्रनलिका:
उत्सर्जन-प्रजनन संस्थेतील ही अंतिम नलिका आहे. वीर्य व मूत्र उत्सर्जनाचा हा
समाईक मार्ग आहे.
कंदमूत्रमार्ग
ग्रंथी (Bulbourethral gland) (काउपर ग्रंथी - Cowper's
gland): ह्या दोन ग्रंथी
शिश्नाच्या मुळाशी, मूत्रमार्गाच्या
पाठीमागे दोन बाजूंना असतात. यांतील स्राव बुळबुळीत व श्लेष्मल असतो. लैंगिक
उत्तेजनेच्या वेळी हा स्राव दोन नलिकांवाटे मूत्रमार्गात टाकला जातो. त्यामुळे
संभोग सुलभ होतो. याच प्रकारच्या व हेच कार्य करणार्या ग्रंथी स्त्रीमधेही आढळतात
(बार्थोलिन ग्रंथी)
बाह्य पुरुष
जननेंद्रिये
पुरुष प्रजजन
संस्थेमधील बाहेरून दिसणारी प्रमुख इंद्रिये म्हणजे शिस्न, वृषणकोश आणि वृषण. त्यांपैकी वृषणाची माहिती 'अंतर्गत पुरुष जननेंद्रिये' येथे दिली आहे.
शिश्न
हे
संभोगाचेपुरुषाच्या शिश्नामध्ये हाड किंवा स्नायू नसतात. शिश्न हे कॉर्पोरा
कॅवर्नोझा पुरुषाच्या शिश्नामध्ये हाड किंवा स्नायू नसतात. शिश्न हे कॉर्पोरा
कॅवर्नोझा ...
लिग उत्थानक्षम
पुरुष इंद्रिय आहे. ओटीपोटाच्या खाली चिकटलेले मूळ, दंडगोलाकृती मध्यभाग आणि टोकाशी शिस्नमणी असे
शिश्नाचे तीन भाग असतात. शिश्नाच्या दंडगोलाकृती भागामध्ये स्पंजासारख्या सच्छिद्र
उतीच्या बनलेल्या तीन दंडगोलाकृती कांडया असतात. त्यांपैकी खालच्या कांडीतून
मूत्रनलिका जाते व शिश्नमण्याच्या टोकावर उघडते. या नलिकेतून मूत्र आणि वीर्य
यांचे वहन होते. सच्छिद्र उतीच्या दंडगोलाकृती कांडया उत्थानक्षम असतात. संभोगाचे
वेळी त्यांच्यात रक्त साठून त्यांचे आकारमान वाढते व त्या ताठ होतात. त्यामुळे
शिश्न ताठ व योनीमार्गात प्रवेश करण्यासाठी सिद्ध होते. संभोगाचे वेळी शिश्नावाटे
वीर्य स्त्री जननेंद्रियामध्ये क्षेपित केले जाते. शिश्नावर सैल त्वचावरण असते व
ते शिश्नमण्यावर दुहेरी घडीच्या स्वरूपात पसरलेले असते. ही त्वचेची घडी व
शिश्नावरील त्वचा सैल असल्याने शिश्नाचा आकार मोठा झाला तरी ती शिश्नास सामावून
घेते.
स्त्री
प्रजननसंस्था
बीजांड तयार करणे,
त्याचे वहन करणे, संभोगाचे वेळी प्रवेश केलेल्या शुक्रजंतुंबरोबर
त्याचा संयोग घडवून त्याचे फलन करणे, फलित बीजांडाचे (गर्भाचे) पोषण करणे, योग्य वेळी प्रसूती घडवून बाह्य जगात टिकाव धरू
शकणारे अर्भक जन्माला घालणे आणि त्याला स्तनपान देऊन त्याचे पुढे पोषण करणे यासाठी
स्त्री प्रजनन संस्था आणि त्यातील अवयव विकसित झालेले असतात.
बालक स्त्रीलिंगी
जन्मलेले असले तरी कुमारावस्थेपर्यंत जननेंद्रीयांची फारशी वाढ झालेले नसते.
पौगंडावस्थेत पोष ग्रंथी व बीजांडकोशांतून स्रवणार्या संप्रेरकांच्या प्रभावामुळे
जननेद्रियांमध्ये झपाट्याने बदल होऊन ती विकसित होतात.
अवयवांची रचना व
कार्य
स्त्री प्रजननसंस्थेमध्ये[४]
काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी (बाह्य) व काही शरीरांतर्गत असतात. तसेच त्यांच्या
विकासात व कार्यात अनेक अंतःस्रावी ग्रंथींचाही सहभाग असल्याने त्यांचाही समावेश
स्त्री प्रजननसंस्थेत होतो.
अंतर्गत स्त्री
जननेंद्रिये
स्त्री प्रजनन
संस्थेमधील बाहेरून न दिसणाऱ्या इंद्रियामध्ये बीजांडकोश, बीजांडवाहिनी, गर्भाशय आणि योनी यांचा समावेश
होतो.गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक असे दोन बीजांडकोश श्रोणिगुहेमध्ये
असतात. त्यांमध्ये सर्वसाधारणपणे दरमहा एक याप्रमाणे बीजांडे तयार होतात.
बीजांडांची निर्मिती आणि उत्सर्जन पोष ग्रंथीमधील पुटक उद्दीपक संप्रेरक व
पीतपिंडकारी संप्रेरक यांच्या प्रभावाखाली होते. त्याचप्रमाणे बीजांडकोशातून
ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके स्रवतात. या संप्रेरकांमुळे
गर्भाशयातील अंत:त्वचा फलित बीजांडाच्या रोपणासाठी सज्ज करणे, फलित बीजांडाचे गर्भाशयात रोपण, गर्भारपण आणि मासिक पाळी यांचे नियंत्रण
होते.
याप्रमाणे
बीजांडांची निर्मिती करणारी प्रजननग्रंथी आणि ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या
अंतःस्रावांची निर्मिती करणारी अंतःस्रावी ग्रंथी असे दुहेरी कार्य बीजांडकोश
करते. बीजांडवाहिनी
दोन्ही
बीजांडकोशांजवळ प्रत्येकी एक बीजांडवाहिनी असते. या नलिकेचे मोकळे तोंड
बीजांडकोशाजवळ असते आणि दुसरे टोक गर्भाशयाला जोडलेले असून गर्भाशयात उघडते.
बीजांडकोशातून
श्रोणीगुहेत मुक्त झालेले बीजांड बीजांडवाहिनीच्या बीजांडकोशाच्या जवळील मोकळ्या
तोंडाकडून ग्रहण केले जाते आणि तिच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेले जाते.
योग्य वेळी शुक्रजंतू उपलब्ध झाल्यास बीजांडाचे बीजांडवाहिनीतच फलन होते. फलित
किंवा फलन न झालेले बीजांड शेवटी गर्भाशयात जाते. फलित बीजांडाचे गर्भाशयात रोपण
होते. फलन न झालेले बीजांड मासिक स्रावाबरोबर शरीराबाहेर टाकले जाते.
गर्भाशय
श्रोणिगुहेत
दोन्ही बाजूंच्या बीजांडवाहिन्या आणि योनी यांच्या मधे गर्भाशय असते. ही स्नायूंची
जाड पिशवी असून आतील पोकळी अरूंद फटीसारखी आणि त्रिकोनी असते. त्याच्या दोन
टोकांना बीजांडवाहिन्या जोडलेल्या असतात आणि त्या गर्भाशयपोकळीत उघडतात. त्याच्या
खालच्या निमुळत्या ग्रीवेतून गर्भाशयाचे तोंड योनिमार्गात उघडते.
मासिक पाळीच्या
चक्रात गर्भाशयाच्या अंत:त्वचेमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांच्या
प्रभावाखाली दरमहा बदल होतात. ते फलित बीजांडाच्या रोपणास व पोषणास योग्य असे
असतात. फलित बीजांडाचे (गर्भाचे) रोपण झाल्यावर (गर्भधारणा) त्याची पूर्ण वाढ
होईपर्यंत गर्भ सुरक्षित ठेवणे आणि गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रसूती ही
गर्भाशयाची महत्त्वाची कामे आहेत.
बीजांडाचे फलन न
झाल्यास ते, अंतःत्वचेचा वरील
थर व थोडे रक्त मासिक पाळीच्या रक्तस्रावाच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकले जातात व
मासिक पाळीचे नवीन चक्र सुरु होते.
योनी
गर्भाशय आणि
बाह्य जननेंद्रीये यामधील स्थितीस्थापक तंतुस्नायुमय नलिकेस योनी म्हणतात. तिचे
गर्भाशयाकडील तोंड गर्भाशयग्रीवेला सर्व बाजूनी चिकटलेले असते व गर्भाशयमुख
तिच्यात उघडते. तिचे दुसरे तोंड बाह्य जननेंद्रीयात मूत्रमार्गाखाली उघडते.
स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग आणि योनी मार्ग (संभोगाचा मार्ग) वेगवेगळे असतात.
कामोत्तेजित
अवस्थेत बाह्य जननेंद्रीये व योनीत तयार होणारे स्राव संभोगाच्या वेळी योनीत
शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात. त्यावेळी योनी शिश्नास सामावून घेते व क्षेपण
झालेले वीर्य साठवून ठेवते. वीर्यातील शुक्रजन्तू तेथून गर्भाशयमुखामार्गे
गर्भाशयात प्रवेश करतात.
तसेच प्रसूतीच्या
वेळी गर्भाशयातून बाळ योनीत प्रवेश करते व योनीमुखाद्वारे जन्म घेते.
याप्रमाणे संभोगाचा
आणि प्रसूतीचा मार्ग म्हणून योनी काम करते.
अश्या प्रकारे मानवाचा जन्म होतो , असेच पृथ्वीवर असणाऱ्या
प्रत्येक जीवांचा जन्म होतो .
प्रत्येक जीवांची वेगवेगळ्या पद्धतीची प्रजनन पद्धत आहे . एखाद्या
जीवाला जन्म घेण्यासाठी सर्वात प्रथम नर आणि मादी ह्या जीवांची गरज असते .
मग मला प्रश्न पडतो हे धार्मिक ग्रंथ आपल्या समाजातील
लोकांना चुकीचे ज्ञान देत असतात .
खरच का ब्राम्हीन ब्रम्हाच्या तोंडातून जन्माला असेल ??
खरच का वैश्य बाहुतून जन्माला असेल ?
खरच का क्षत्रिय जांघेतून आणि शुद्र पायातून जन्मले असतील ???
ब्राम्हीन हा ब्रम्हाच्या तोंडून जन्मला ह्याला तथ्य काय
आहे ??
पुरुषाच्या तोंडात तर दात , जीभ, अन्न पाचक ग्रंथी असतात मग
एखादा पुरुष एखाद्या पुरुषाच्या तोंडातून कसा काय जन्म घेऊ शकतो ??? धार्मिक ग्रंथ आपणाला वेडे बनविण्याचे काम
करतात . फसू नका .
प्रत्येक गोष्टी मध्ये तथ्य काय असेल जाणून घ्या , अभ्यास
करा , तर्क करा .
महेश शिंदे
Comments
Post a Comment