डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचे काय वाईट केले आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचे काय वाईट केले आहे . एका हिंदू समाजात अतिशुद्र समजल्या जाणाऱ्या घरात जन्म झाला , लहानपणापासून जातीवादी समाजाकडून अन्याय सहन केला . अतिशुद्र असल्यामुळे त्यांना मंदिरात ,शाळेत प्रवेश दिला नाही . मानवा मानवात असलेला भेद मिटवला त्यांनी तुमचे काय वाईट केले? अतिशुद्र समाजातील लोकांना आणि संपूर्ण भारतीयांना समान हक्क देणाऱ्या व्यक्ती ने तुमचे काय वाईट केले आहे ? लहान मुले ,स्त्रियांना समान हक्क दिला . हिंदू धर्मात स्त्रियांना चुल आणि मुल संभाळावे असे समजत होते , पती मेल्यावर त्याच्या चितेवर बसायला लागत असे , स्त्रियांना मालमत्तेत वाटा मिळत नव्हता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबील आणून ब्राह्मणांनी स्त्रियांवर लादलेली ही गुलामी नष्ट केली मग सांगा स्त्रियांनो तुमचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काय वाईट केले ?? एक उच्चशिक्षित व्यक्ती शिकतो ,नोकरी त लागतो . त्यांच्या नोकरीत 12 तासाचे आठ तास , तेरा महीने पगार , पगारी रजा , मासिक भत्ते , पेंशन ह्या सर्व योजना व्हाईसरॉय च्या कोन्सील मध्ये जाऊन लेबर मंत्री होते त्यावेळी संमती करून घेतात मग नोकरदारांनो डॉ बाब...