मी कधीही भूत पाहीलेले नाही


मित्रांनो पुन्हा एकदा तर्क करुयात आजचा विषय जबरदस्त आहे . प्रत्येक जगातील लहान , छोट्या , वयस्कर व्यक्ती ला ह्या गोष्टीं पासून भय होते . अर्थात सर्वजण घाबरतात . तो विषय आहे !!

भूत . 
 आजतागायत म्हणजे वयाच्या 30 वर्षापर्यंत मी कधीही भूत पाहीलेले नाही . कोणाच्या पाहीन्यात आले आहे का ?? कोणाला समोरून दिसले आहे का?? भूत हे नाव सर्वात पहिल्यांदा कोणी दिले ?? भूत हे नाव भुतांच्या कम्युनिटी ने दिले आहे का ?? 
आम्ही लहानपणापासून भुतांच्या गोष्टी ऐकत आलो आहोत . जो मित्र किंवा कोणी एखादा मित्र ह्या गोष्टी सांगायचा त्याने सुद्धा ह्या ऐकलेल्या असतात ?? त्याने भूत पाहीलं होतं असे सत्य कधीही तो मांडत नसे . 

काही लोक भूतांच्या बाबतीत अनुभव सांगताना भूत कसं जगात आहेचं ह्या बाबतीत विश्वास ठेवावाच लागेल असे  प्रत्येकाला सांगत असतात . 

भुत आहे असे सांगताना लोक भुतांच्या जबरदस्त मानवी मेंदूत आणि मेंदूच्या कल्पना बाहेर आणतात . हिकडून तिकडून ऐकून कुठे टिव्हीवर सिरीयल पाहून तर कुठे चित्रपट पाहून तश्याच कल्पना मांडतात . 

आता टिव्हीवर , चित्रपटात दाखवणारा भूत वास्तविक जिवनात 
दिग्दर्शक , कलाकारांनी पाहीलेला असतो का ???

भुत कधी बनते ?? भूत दिसायला कसे असते ??आजपर्यंत एवढे महापुरुष होऊन गेले तर त्यांनी भूत पाहिले होते असे का नाही सांगितले ??
गौतम बुद्ध , महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती शाहू महाराज, बसवेश्वर महाराज, संत तुकाराम ,भारतात जेवढे ही संत होउन गेले त्यांनी कुठे लिहून ठेवले आहे का की त्यांना भूत दिसण्यात आले आहे ??? 

कोणत्याही महापुरुषांनी भुतांच्या विरोधात लढा दिलेला नाही!
कारण काय असावे ?? आजतागायत कोणत्याही महापुरुषांनी भुताच्या बाबतीत काहीच कसे लिहले नाही ??त्यांना भूत का दिसले नसेल??त्यांना भुतांनी त्रास का दिला नसेल ??

काही चित्रपटात चांगले भूत आणि वाईट भूत असा फरक केलेला आहे . चांगले भूत
चित्रपटात असे सांगितले जाते की जी व्यक्ती अन्याय होऊन म्रुत्यु होते ति म्हणजे चांगला भूत . आणि जी गुन्हा करून म्रुत्यु होते ती म्हणजे वाईट भूत ?

म्रुत्यूनंतर व्यक्ती चे सर्व अवयव निकामी होतात , त्याचे मन,विचार, प्रेम ,भावना ह्या संपूर्ण संपून जातात . भग भूताकडे असे कोणते अवयव असेल जे भूत चांगले किंवा वाईट असे फरक करू शकेल??

भूत कोणत्या अवयवांचा वापर करून सुड किंवा भिती दाखवते??
भूत फक्त मनुष्याला बनता येते का?? प्राणी, पक्षी, किटक,सुक्ष्मजीव भुत बनू शकतात का??

भूत रचना पण जबरदस्त केलेली असते रचनाकाराने . 
भूताचे दोन प्रकार दाखवले जातात एक स्त्री भूत त्यामध्ये चांगले स्त्री भूत आणि वाईट स्त्री भूत . दुसरे पुरुष भूत त्यामध्ये चांगले पुरुष भूत आणि वाईट पुरुष भूत . 

ह्या पैकी कोणतेही भूत असुद्या त्याची रचना जबरदस्त असते बरं का ??? विचार करा !!!

रचनाकाराने त्याने ते कधीही पाहीलेले नसते पण त्याच्या मेंदूची उपज ते त्याला तसा आकार देते . आपण स्त्री भूताच्या कल्पने बद्दल जाणून घेऊया 
कधी लाल डोळ्याचे ,तर कधी केस सोडलेले , तर कधी हाताची नखे वाढलेले , एक डोळा फुटलेला , तोंडावर काळे डाग, तोंड विचीत्र केलेले , तोंडातून कसला तर द्रव बाहेर येत आहे असे
पाय उलटे , संपूर्ण भूत कुजलेले असले रचना करून भुत वास्तविक जीवनात आहे असे टिव्हीवर किंवा चित्रपटात दाखवले जाते . 

प्रश्न हा पढतो . 
मानवी शरीरातून म्रुत्यूनंतर कसल्याही संवेदना रहात नाहीत . ना हालचाल होते ,ना ह्दयाची ठोके होतात , ना रक्ताभिसरण होते , ना मेंदूच्या काही क्रिया घडतात . संपूर्ण शरीरातील असणाऱ्या ग्रंथी , हार्मोन्स त्यांचे कार्य चालू ठेवते . म्रुत्यूनंतर त्या हार्मोन्स ना शरीरात पसरतात . तिथे त्यांना खायला भेटत नाही म्हणून त्या शरीराला खायला चालू करतात . त्यातून कुजण्याची प्रक्रिया चालू होते . त्यात खूप सारे सुक्ष्मजीव, अळ्या तयार होतात आणि संपूर्ण म्रुत शरीराला खायला चालू करतात . म्रुत शरीरात कोणताही प्राण नाही आहे . संपूर्ण म्रुत शरीर कुजून जाते . व शेवटी हाडांचा सापळा शिल्लक राहतो . आता सापळ्याला ना वेदना आहेत ना संवेदना . ना सापळा चालू शकतो बोलू शकतो कोणतेही कार्य करू शकतो . मग जे भूत रचनाकार दाखवतो किंवा सांगितला जातो त्या भुतात जीव कसा येणार??
म्रुत शरीरात प्राण आला आजपर्यंत कोणी पाहिले आहे का?
व्यक्ती कितीही प्रेमळ असुद्या त्याच्या म्रुत्यूनंतर तो कधीही जिवंत होणार नाही . कितीही रडा,आदळा आपटा म्रुत व्यक्ती पुन्हा जीवंत होत नसतो . 
मग हे सत्य असून टिव्हीवर, चित्रपटात भूत असल्या रचना दाखवून अज्ञान पसरविता. 
ना भूत कोणी पाहीला आहे , अनुभवायला आला आहे , शरीराने स्पर्श करता आला आहे . मग भूत आहे असे कसे म्हणू शकता ???

साधा सरळ प्रश्न 
हवा अनुभव शकतो , पाणी अनुभव शकतो , त्याला स्पर्श करु शकतो , मनुष्य त्याच्या इंद्रिये चा वापर करून हवा ,पाणी , वास, सुगंध, अग्नी , ह्या गोष्टी अनुभव घेऊ शकतो मग भूताचा का अनुभव घेऊ शकत नाही ??का त्याला स्पर्श करू शकत नाही??

वैज्ञानिक भाषेत भूतांबद्दल जर भिती वाटत असेल तर त्याला मेंदूच्या विकाराच्या  भाषेत फास्मोफोबीया आणि स्पेक्ट्रोफोबीया म्हणतात . आणि ह्या विकाराची कारणे आहेत टिव्ही , चित्रपट आणि गोष्टी मध्ये सांगितले जाणारी भूत ही संकल्पना आणि त्याबद्दल वाटणारी भिती . एकटे संडास किंवा बाथरूममध्ये जायला सुद्धा लोक घाबरतात . एकटे रहायला सुद्धा घाबरतात आणि ह्याचे कारण फास्मोफोबीया आणि स्पेक्ट्रोफोबीया आहे . 
आजपर्यंत एवढे शोध लागले वैज्ञानिक आणि अंतराळवीर बाहेर गेले पण आजतागायत त्यांना भूत कुठेही दिसला नाही . 

मनुष्य हा सर्वात नालायक प्राणी आहे तो कोणत्याही गोष्ट अनुभव घेण्यापेक्षा ऐकण्यावर खूप विश्वास ठेवतो . तर्क करत नाही . विचार करत नाही . कोणी सांगेल त्याच्या वर विश्वास ठेवतो . डोळ्यासमोर जे दिसत आहे वास्तविक घडत आहे त्याच्या वर विश्वास ठेवत नाही . ह्या कारणामुळे लोकांच्यात अज्ञान भरपूर आहे . प्रत्येक धर्माचे विचार हे आत्मा भूत ह्या गोष्टींचा वापर करून लोकांना धर्मावर विश्वास ठेवायला भाग पाडतात . 
आणि लोकांच्या मनात कट्टरता निर्माण होते . आणि अज्ञान पसरते . 

तर लोकहो 

1. केवल परम्परा से प्रचलित होने के कारण किसी विषय को सत्य या समुचित नहीं मान लेना चाहिए,

2. इस विषय को अतीव प्राचीन काल से कहा जा रहा है इसलिए भी उसे सत्य नहीं मान लेना चाहिए,

3. यह विषय धर्मग्रन्थों में इस प्रकार कहा गया है इसलिए भी उसे सत्य नहीं मानना चाहिए,

4. किसी भी वाद के निराकरण के लिए इस तथ्य का ग्रहण समुचित है, यह नहीं मान लेना चाहिए (काल, अवस्था और परिस्थिति के अनुसार तथ्य परिवर्तित भी हो सकते हैं।)

5. बड़ा आकार या गुरुत्व होने से भी कोई बात स्वीकार्य नहीं हो जाती है।

विषय कळाला असेल असे ग्रहीत धरतो . 

महेश शिंदे 
7057801271

Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम