डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचे काय वाईट केले आहे

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचे काय वाईट केले आहे .
एका हिंदू समाजात अतिशुद्र समजल्या जाणाऱ्या घरात जन्म झाला , लहानपणापासून जातीवादी समाजाकडून अन्याय सहन केला .
अतिशुद्र असल्यामुळे त्यांना मंदिरात ,शाळेत प्रवेश दिला नाही . मानवा मानवात असलेला भेद मिटवला त्यांनी तुमचे काय वाईट केले?
अतिशुद्र समाजातील लोकांना आणि संपूर्ण भारतीयांना समान हक्क देणाऱ्या व्यक्ती ने तुमचे काय वाईट केले आहे ?
लहान मुले ,स्त्रियांना समान हक्क दिला . हिंदू धर्मात स्त्रियांना चुल आणि मुल संभाळावे असे समजत होते , पती मेल्यावर त्याच्या चितेवर बसायला लागत असे , स्त्रियांना मालमत्तेत वाटा मिळत नव्हता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोडबील आणून ब्राह्मणांनी स्त्रियांवर लादलेली ही गुलामी नष्ट केली मग सांगा स्त्रियांनो तुमचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काय वाईट केले ??
एक उच्चशिक्षित व्यक्ती शिकतो ,नोकरी त लागतो . त्यांच्या नोकरीत 12  तासाचे आठ तास , तेरा महीने पगार , पगारी रजा , मासिक भत्ते , पेंशन ह्या सर्व योजना व्हाईसरॉय च्या कोन्सील मध्ये जाऊन लेबर मंत्री होते त्यावेळी संमती करून घेतात मग नोकरदारांनो डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचे काय वाईट केले आहे??
भारत स्वतंत्र झाल्यानंतर समता, स्वतंत्र, बंधुता सांगणारे  भारतीय संविधान लिहून ह्या देशातील प्रत्येक व्यक्ती ला प्रजासत्ताक , लोकशाहीचा हक्क देतात मग सांगा भारतीय नागरिकांनो डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचे काय वाईट केले आहे ?
प्रत्येक व्यक्ती स मतदानाचा हक्क दिला मग सांगा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचे काय वाईट केले ??
हिराकुड , भाक्रा नांगल या सारखे मोठमोठे विद्युत प्रकल्प उभे केले मग सांगा भारतीय लोकांनो डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचे काय वाईट केले आहे??
भारतातील भुमिपुत्र तथागत गौतम बुद्ध याला पुन्हा भारतात आणण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि भारतातील जणतेस शांती ,प्रज्ञा ,शील ,करुणा सांगणारा बुद्ध दिला मग भारतीय लोकांनो सांगा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचे काय वाईट केले ??
आरक्षण हे छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा आणले आरक्षणाचा जणक छत्रपती शाहू महाराज होते आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला घटणेत घेऊन आले मग सांगा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचे काय वाईट केले??

एक सुशिक्षित, शिकलेला , भारतीय नागरिकांना समान हक्क देणारा एकाच जातीत कोणी बांधला .

आपल्या भारतीय लोकांच्या मनात जातीचा अहंकार अजूनही गेलेला नाही ,लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खालच्या  जातीचे होते हा आकस ठेवून असतात . आणि सरळ म्हणतात की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या साठी काय केले ??

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या साठी काय केले ?? असे म्हणणारे लोक एक तर पुस्तके कमी वाचतात ,जातीचा माज करतात ,त्यांना समता ,स्वतंत्र आणि बंधुभाव ह्या तीन गोष्टीं सोबत काही घेणे देणे नाही आहे . त्यांना फक्त गुलामी लादायची आहे . आणि ही शिकवण त्यांच्या घरातून च असते बरं का ? आरक्षण काय आहे कश्यासाठी होते ह्याचा अभ्यास कमी असून आरक्षणाचा राग डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती काढणारे सुशिक्षित कारटी मित्र मंडळ मी अनुभवली आहेत .
आयुष्यात ह्या मित्रांना मला सांगायचे आहे कमीत कमी एखादे डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित  पुस्तक मन लावून वाचा आणि त्यांची विचार धारा समजून घ्या . मग बघा डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे राहणार नाहीत ते सर्वांचे राहतील . छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले  हे सर्व महापुरुष समस्त भारतीय लोकांच्या कल्याणासाठी ह्या देशात जन्म घेऊन गेले . अशे महापुरुष प्रत्येक वेळी बनने खूप कठीण असते . पण आपण सर्व एक होऊन एक विचार धारा मानून पुन्हा महापुरुषांची स्वप्ने पुर्ण करू शकतो .

जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
महेश शिंदे
7057801271

Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम