तर्क करुयात

चला मित्रांनो तर्क करुयात .
पहिला प्रश्न आत्मा काय आहे ??
काही लोक असे सांगतात की त्यांनी आत्मा पाहीला आहे . किंवा त्यांच्या मित्रांनी आत्मा पाहीला आहे . बर हे सत्य असेल तर विश्वास कसा ठेवायचा??
त्यांना मला हे प्रश्न विचारायचे आहेत की आत्मा कसा असतो ???चित्रपटात दाखवतात तसा असतो का ?? का तो हुबेहूब त्या व्यक्ती सारखा असतो ?? जर हुबेहूब त्या व्यक्ती सारखा असेल तर त्याला व्यक्ती चा म्रुत्यु होऊनही संवेदना असतात का ?? त्याला नाक , कान ,डोळे ,मेंदू बाकीचे इतर अवयव जे आपल्याला जिवंत पणी असतात ते ही त्या आत्म्याला असतात का?? तो आत्मा पाहू शकतो काय ??मग त्याला डोळे असतील ??म्रुत्यु होउन संपूर्ण अवयव जळून घाख होतात मग डोळे ,कान ,नाक ,हे अवयव कसे काय त्याला असतात??
आत्मा वास घेऊ शकतो काय ? आत्मा संवेदनशील आहे का??त्याचा रंग कसा असतो ?? त्याला आजतागायत कोणी कोणी पाहीला आहे ?? आत्मा आहे तर लोकांना का दिसत नाही?? . त्याने आजतागायत किती लोकांना मदत केली ??
चित्रपटात दाखवले जाणारे आत्मे प्रत्येक बंगल्यात का जाऊ शकत नाहीत??
आत्मा जर दिसत असेल तर तो जाड आहे का पातळ आहे ??तो कुठे पर्यंत आणि किती वेगाने जाऊ शकतो ??दिवस आणि रात्रभर आत्मा कुठे राहत असेल ???
एखादा जिव लावणारा प्रिय व्यक्ती असेल आणि त्याचा म्रुत्यु झाला असेल तर आजतागायत त्यांच्या नातेवाईकांना आत्मा का दिसला नसेल ??
जर आत्मा हवेत तरंगत असेल म्हणजे त्याचे वस्तुमान म्हणजे वजन हे हवेच्या वस्तुमानापेक्षा कमी असेल तर हवा वजनदार आहे मग जर हवा आत्म्याला उडताना मदत करत असेल तर मग आत्म्याचे वजन हे खूप कमी असणार मग वजन कमी असलेला आत्मा इतरांना त्रास कसा काय देऊ शकतो ???
चला तर आपण आता आत्म्याला शांती मिळते ह्या सिद्धांतावर प्रश्न चिन्ह करू??
म्रुत्यु नंतर आत्म्याला शांती मिळते म्हणजे नेमकं काय मिळते ??
मनुष्य असा आहे त्याला प्रेम , भावना , काळजी ,आठवण , ईच्छा ह्या सर्व गोष्टी तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत च असतात . समजा एखाद्या व्यक्ती ला भरपूर पैसे मिळाले किंवा त्याच्या जिवनात सुख धन संपत्ती मिळाली तर तो त्या क्षणाला त्रुप्त होतो त्या क्षणी त्याच्या शरीरात असणाऱ्या मनाला शांती मिळते तर मग म्रुत्यु नंतर त्याच्या सर्व ईच्छा ,राग , भावना ,द्वेष ,काळजी सर्व ईच्छा त्याच्या शरीरासोबत मरून जातात कारण शरीर आहे तो पर्यंत च ईच्छा आहेत तर मग शरीर गेल्यानंतर आत्म्याला एकही अवयव नाही आहे.
ना मन आहे ना ह्रुदय आहे ना कोणत्याही संवेदना तर मग असे कोणते अवयव आहे जे म्रुत्यूनंतर आत्म्याला शांती देत असेल ???
आत्म्याला म्रुत्यूनंतर कोणते अवयव असते ???
आत्मा फक्त मनुष्याकडेच असतो का ?? बाकीचे प्रुथ्वीवर राहणारे किटक, प्राणी ,पक्षी , फुले , वनस्पती , सुक्ष्मजीव, शैवाळ, सर्व सजीव म्रुत्यूनंतर ह्यांचे आत्मे कोणी पाहिले आहेत का ??
कोणी आत्मा पाहीला असेल तर संपर्क करा
महेश शिंदे
7057801271

Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम