भाज्या मळवली लेणी
आज पुन्हा तथागत गौतम बुद्ध यांच्या भुतकाळाच्या शोधात मी लोणावळा मळीवली येथील "भाज्या".लेण्यात भेट दिली .
काही गोष्टी पुराव्यानिशी जर द्यायच्या असतील तर त्याला पुरावा लागतो असाच पुरावा शोधण्यासाठी आज भाज्या लेण्यात भेट दिली .
इ स वी सन 627 ,च्या काळात लोयांग वरुन ह्युएन त्संग भारतात आला होता . त्या ला बुद्ध आणि त्यांच्या धम्म विचारांचे ज्ञान हवे होते . असंख्य मोठी वादळं पेलावत मोठ मोठ्या संकटातून बाहेर पडत अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मीर ,उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश ,कांचीपुरम, कोंकणपुरा , महोलच म्हणजे महाराष्ट्र नंतर गुजरात करत नालंदा पुन्हा तक्षशिला अफगाणिस्तान किर्गीक्सस्थान करत 957 बुद्ध ग्रंथ आणि बुद्ध ज्ञान घेऊन भारतातून 645 च्या काळात चायना म्हणजे चीन ला गेला . त्याची ही जिज्ञासू व्रुतीच्या मी प्रेमात पडलो आणि आपल्यामध्ये किमान अंश यावा त्यांच्या विचारांचा म्हणून बुद्ध आणि त्यांच्या विचारांची माहिती गोळा करु लागलो ...
【सत्यशोधक महेश शिंदे】
नमो बुध्दाय जयभीम सर 🙏
ReplyDeleteसर आम्ही पण भाजा लेणी ला भेट दिली पण उशिरा पोहोचल्यामुळे जास्त निरीक्षण करता आले नाही, आधी कार्ला लेणी बघितली मग भाजा लेणी बघितली.