【येरफळे हिनयान लेणी】Yerfale Caves
【येरफळे हिनयान लेणी】
🙏 नमस्कार मित्रांनो,
मी महेश शिंदे.
आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक खूप महत्वाचा दिवस आणि त्यातील अनुभव सांगणार आहे.
🏞️ आजची भेट
आज मी भेट दिलेली लेणी आहेत –
【येरफळे】 आणि 【तमकणे】, पाटण (सातारा) भागातील.
अतिशय दुर्गम प्रदेशात ही लेणी आहेत.
पण सर्वात मोठा अभिमान वाटतो की –
तथागत गौतम बुद्धांचे विचार या डोंगरदऱ्यांमध्ये, या लेण्यांमध्ये आले आहेत. 🌿
🚶 प्रवासाची कहाणी
सुरुवातीला माझे मित्र प्रताप लोंढे आणि अक्रम सुतार यांना घेऊन
ऊंब्रच मार्गे येरफळे गावी पोहोचलो.
पहिल्या प्रयत्नात लेणी सापडली नाहीत.
पण दुसऱ्या प्रयत्नात – म्हणजे आज – मला अखेर ही लेणी सापडली.
यासाठी विशेष श्रेय जाते येरफळे गावातील माझा स्थानिक मित्र प्रसाद पडवळ याला.
त्याच्या मदतीशिवाय हा प्रवास अपूर्ण राहिला असता. 🙏 धन्यवाद प्रसाद!
🕉️ इतिहासाची साक्ष
ही हिनयान पंथाची लेणी नागनाथ घळ नावाच्या ठिकाणी आहेत.
"नाथ" म्हणजे नाग.
नागवंशी समाज हा बुद्ध धम्माचा उपासक होता.
आज याच समाजाचे वारसदार – आपले दलित, ओबीसी आणि तथाकथित अस्पृश्य बांधव आहेत.
🏯 लेण्यांतील दर्शन
सर्वप्रथम आम्ही पाहिला एक स्तूप –
अंदाजे 2000 ते 2500 वर्षांपूर्वीचा.
स्तूप जरी ढासळलेला असला तरी त्यातून प्राचीन इतिहास बोलतो आहे.
बाजूला भिक्षूंच्या ध्यानगृहा आहेत.
अप्रतिम अनुभव –
2500 वर्षांपूर्वीचा गौतम बुद्धांचा धम्म इथपर्यंत पोहोचला होता!
"साधू साधू साधू" 🙏
❓ विचार करण्यासारखं
पण एक प्रश्न सतत मनात घोळतो –
तथागतांचे उपदेश सनातनी लोकांना का न पटले?
👉 चोरी करू नये
👉 बलात्कार करू नये
👉 व्याभिचार करू नये
👉 खोटे बोलू नये
👉 चहाड्या करू नये
👉 निंदा करू नये
👉 आई-वडिलांची सेवा करावी
हेच होते तथागतांचे उपदेश.
मग यातला कोणता विचार ब्राह्मण-मनुवाद्यांना मान्य नव्हता?
आणि का त्यांनी यावर अतिक्रमण केले?
🌟 माझा अनुभव
असो…
पण माझ्यासाठी आजचा दिवस खूप सुंदर गेला.
सुट्टीचा योग्य उपयोग झाला.
【✨ सत्यशोधक महेश शिंदे ✨】



















Comments
Post a Comment