थेरवादी स्तूप लेणी (कर्जत कोंडाणा )
【कोंडाणा थेरवादी बुद्धीस्ट लेणी 】
तथागत गौतम बुद्ध यांंचा विचार वाचला ,ऐकला मनाला शांती मिळाली .
लोकांमध्ये जाग्रुती नाही आहे . चांगला विचार ऐकायची सवय नाही आहे .
एखाद्या च्या चहाडी ,निंदा ,आणि टिंगलटवाळी करण्यात लोक आनंद माणतात .
पण तो चांगला मणुष्य आहे ,त्याचं चांगले होवो,सर्व लोक सुखी राहो हा झाला बुद्ध कल्याणकारी विचार . हा विचार क्वचितच लोक स्विकारतात .
मग जर कल्याण करणारा विचार तथागत गौतम बुद्ध यांनी सांगातला . तो हजारो वर्षांपासून अस्तित्वात असताना . अचानक भारतातून नाहीसा कसा झाला ?
कोणी संपविला ?
पंचेचाळीस वर्षे भारतात राहून चारीका केली आणि भारतात महापरीनिर्वाण मिळालं ह्या भारताच्या पुत्राचा इतिहास कोणी लपवला ?
हे शोधण्यासाठी क्वचितच लोक पुढे येतात .
लोक सतत काही ना काही वाईट काढून मला भरपूर नावं ठेवायचे . भुतकाळ भरपूर दुःख दायी होता माझा . मणासारखे लोक भेटले नाही की शिवीगाळ करायचो . काड्या करत फिरायचो .ज्याने आई वडीलांना त्रास होयाचा सोबत स्वतःला ही माणसिक त्रास .
आई वडील म्हणाले काही तर चांगला कर ,नौकरी राहून ,पैसा मिळवून कोण पण मोठं बणतं ,
पण चांगले वागण्याणे नाव होतं ,आदर्श बणतो ,आणि चांगलंच होतं .
प्रताप लोंढे या माझ्या भावाने मला सर्वोत्तम भुमीपुत्र गोतम बुद्ध डॉ आ ह साळुंखे लिखित पुस्तक दिले, मी ते दोनदा वाचले .
सदाचारी., निर्मळ., पुण्ययुक्त,निष्कलंक, निर्दोष ,शुद्ध ,पवित्र अशा महामानव गौतम बुद्ध यांचे विचार हाती पडले , आणि माझ्या विचारात आमुलाग्र बदल झाला . सतत चिडचिडा ,शिवीगाळ करतारा,राग राग करणारा कठोर ह्रुदयाचे रुपांतर प्रेमळ ह्रुदयात झाले .
आपल्या मध्ये हा बदल झाला ,प्रत्येक व्यक्ती ला हा विचार समजला पाहिजे ,लोकांना खरा इतिहास समजला पाहिजे . म्हणून मी एकटा पडलो,तरीही चालेल पण,या चांगल्या मार्गावरून कधीही माघार नाही .
मैत्रेय दिपक कांबळे सर आणि सहकारी मित्रांमुळे अजून जास्त बुद्ध विचार ,लेणी ,स्तुप यांचा अभ्यास होतो आहे .
हा खरा इतिहास सदैव मरेपर्यंत लोकापर्यंत घेऊन जाणार . मग वाटेत कोणी माझा गळा चिरला ,कोणी मला दरीत फेकून दिले ,कोणी मला धमकावले तरीही या सदाचारी मार्गातून माघार नाही .
कोंढाणा केव्हज ला जाताना चे माझे काही अनुभव ।
Comments
Post a Comment