[शेतकऱ्याचा आसूड] पुस्तकामध्ये ३०० स्पार्टा , महान राजा लिओनिडास आणि इराणी राजा झरक्सिस यांच्या लढाईचा चा उल्लेख
सर्वांना क्रांतिकारी जय भीम !!!! ३०० स्पार्टा आणि महात्मा फुले यांचा संदेश सर्वांना क्रांतिकारी जय भीम !!! महात्मा ज्योतिराव फुले यांच्या [शेतकऱ्याचा आसूड] या ग्रंथात, ३०० स्पार्टा सैनिकांचा, त्यांच्या राजा लिओनिडास यांचा, आणि इराणी राजा झरक्सिस यांच्या ऐतिहासिक युद्धाचा उल्लेख आहे. तात्यासाहेब व माईसाहेब यांनी बहुजन समाज, विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि जातीय व्यवस्थेविरोधात अमूल्य कार्य केले. त्यांची तीन अमर पुस्तके – गुलामगिरी ब्राह्मणांचे कसब शेतकऱ्याचा आसूड --- ३०० स्पार्टा युद्ध ग्रीक राज्यातील फक्त ३०० सैनिकांनी लाखो संख्येच्या फारसी/इराणी सैन्याला रोखून लोकशाही, हक्क, आणि स्वातंत्र्याचे रक्षण केले. ते जसे प्राणार्पण करून आपले राज्य व लोकशाही टिकवून ठेवले, तसेच आपल्या भारतातील भीमा कोरेगाव लढाईसारखा हा सत्य इतिहास आहे. --- हॉलिवूडचा 300 हा चित्रपट याच शौर्यावर आधारित आहे. काही प्रौढ दृश्ये वगळता, त्या वीरांचा संघर्ष पाहणे म्हणजे लोकशाहीसाठी लढणाऱ्या योद्ध्यांची प्रेरणा अनुभवणे आहे. --- महात्मा फुले यांचा संदेश – "जनतेचे हक्क, जमीन, पाणी, स्वातंत्र्य आणि लोकश...