नाथांच्या इतिहासाची विक्रुती कोणी केली?

 संपूर्ण नाथपंथीय समाजाने आक्षेप घ्यायला हवा ....विर्य जमीनीवर पडले आणि ते पायाने पुसले आणि त्या बोटात जे विर्य चिकटलेले होते त्यातून एक नाथ जन्माला आला  या ज्या नवनाथांना बदणाम करणाऱ्या कथा आहेत त्यावर संपूर्ण नाथपंथीय लोकांनी आक्षेप घेतला पाहिजे आणि काढून टाकले पाहिजे ....


किती खालच्या पातळीवर जाऊन बहुजन नाथांचा म्हणजेच तंत्रयानी बौद्धांचा इतिहास विक्रुत लिखाण करून नष्ट केला आहे ....


आपल्या महापुरुषांची बदणामी त्यांचे कर्तृत्व आणि इतिहास कसा ब्राह्मण   विक्रुत करतात याचे उत्तम उदाहरण :पुरावा आणि संदर्भ .....


नीट वाचा .....


चला तर कथासार मध्ये नवनाथ यांच्या जन्माबद्दल काय लिहिले आहे ते,

 याची चिकित्सा करुया ....


★  श्रीकृष्ण सभेत बसलेला आहे .उद्धव त्याच्या बाजूला बसलेला आहे सभेस प्रारंभ होताच कवि,हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन,आवीह्रोत्र,द्रुमील,चमस आणि करभाजन या ९ श्रेष्ठ ऋषींचे आगमन झाले ..हेच ते अतिप्राचीन नवनारायण ...श्रीकृष्ण या नवनारायण ऋषींना सांगतो की तुम्ही कलयुगात जन्म घ्यायचा आहे ...कोणी ,कसे कुठे जन्म घेईल ते मी सांगतो ....


★श्रीकृष्ण सांगतो की तुम्ही प्रुथ्वी वर नवनाथ म्हणून जन्म घेऊन नवीन संप्रदाय स्थापन करा..

★कवी यांनी मच्छिंद्र नाथ व्हावे

हरी यांनी गोरक्षनाथ व्हावे

अंतरिक्ष यांनी जालंधरनाथ

प्रबुद्ध यांनी कानिफनाथ

पिप्पलायन यांनी चर्पटीनाथ 

आविह्रोत्र यांनी वटसिद्ध नागनाथ ,द्रुमील यांनी भर्तरी नाथ आणि चमस यांनी रेवणनाथ आणि करभाजन यांनी गहिनीनाथ ...


★श्रीकृष्ण याचे बोलणे ऐकून हे नवनारायण म्हणतात की आम्ही कुठे आणि कसे जन्म घ्यावे ...


★श्रीकृष्ण म्हणतात .....


कविनारायण यांनी 


उपरिचर वसू  विमाणातून आकाशमार्गे जात आसताना ऊर्वशी ला पाहून त्याचे विर्य स्सखलीत झाले ...ते विर्य  दर्भावर विमाणातून खालि आदळले त्याचे तीन भाग झाले ...त्यापैकी दोन भाग यमुना प्रवाहातील द्रोण मध्ये आणि एक भाग पाण्यात पडला ..तो विर्याचा भाग भक्ष्य समजून एका मत्सानी गिळला  मग त्या गिळलेल्या विर्याच्या भागात कविनारायणाणे जीव ओतावा आणि माशाच्या उदरातून जन्म घ्यावा आणि मच्छिंद्र नाथ म्हणून जन्म घ्यावा ....


चिकित्सा : विमाणातून विर्य पडले ,विमान त्याकाळी अस्तित्वात होते का? विर्य इतक्या उंचीवरून पडल्यानंतर  त्याच्या मध्ये असलेले शुक्राणू जीवंत राहिले असतील का ?शुक्राणू दोन मिनिटे सुद्धा बाहेर राहू शकत नाहीत ...ते मरुन जातात ....आणि  विर्य पडले तेव्हा त्याचे तीन भाग झाले म्हणजे विर्य क्युसेक मध्ये पडले असावे ,किती विर्य पतन होते जास्तीत जास्त पंधरा ग्रँम पर्यंत ... इतके जास्त विर्य बाहेर पडणे व्यक्ती ही तितकाच अवाढव्य असायला हवा ...प्रुथ्वी वर इतका जास्त विर्य टाकणारा कोणताही प्राणी अस्तित्वात नाही ... 


पुरुष आणि स्त्री यांच्या शारीरिक संबंधातून संतंती जन्माला येते .... पुरुष हा शरीर संबंधातून विर्य स्त्री च्या योनीमार्गात सोडतो पुढे विर्यातील शुकाणू स्त्री च्या गर्भाशयात जातात तिथे स्त्री च्या ओवाला भेटतात आणि पुढे गर्भ राहून तिथे ९ महीने ९ दिवसांनी शिशु जन्माला येतो .... मग मत्स्य आणि पुरुषांच्या विर्यातून संतती कशी जन्माला येऊ शकते ? 

मानवी पुरुषाची प्रजनन संस्था वेगळी आहे तो.सस्तन प्राणी आहे ...आणि मत्स्य मासा हा वेगळ्या प्रजातील आहे ...आणि विर्य गिळल्याने कसा काय गर्भ राहु शकतो ?     हे शक्य नाही आहे ....


भस्म आणि शेणाच्या राखेतून गोरक्षनाथ जन्माला आला आहे ... ईथं तर प्रजनन ,पुरुष आणि स्त्री शारीरिक संबंध यांना फाट्यावर मारले गेले आहे ...यज्ञात अग्नी टाकल्याने गर्भ राहतो आणि तिथे जालंधर जन्माला येतो हे हि प्रजननाच्या बाहेरचे आहे ... 


सरस्वती च्या आकर्षनाने ब्रम्हा चे विर्य हिमालयातील हत्ती च्या काणात पडले आणि तिथे काही विर्य वाघाच्या पायाच्या भेगेत गेले तिथे अत्र्यांनी जन्म घेतला ... पायाच्या भेगेत मानवाचा जन्म कसा काय होऊ शकतो ?गजकर्ण झालेल्या जखमेतून जे विर्य पडले होते त्या ठिकाणी कानिफनाथ जन्माला आले होते .


शिव पार्वतीच्या विवाहाच्या वेळी ब्रम्ह तिथे होता त्याने पार्वतीचे सौंदर्य पाहिले तिथे त्याचे विर्य गळाले . लाजलेल्या ब्रम्हाने ते तिथे पायाने रगडले त्या विर्यातून साठ हजार ऋषी जन्माला आले ... त्याचा भाग काही केरासोबत भागिरथी मध्ये पडला त्यातून पिप्पलायन याने चर्पटीनाथ म्हणून जन्म घेतला .... 


विर्याचा काही भाग सर्पणिच्या डोक्यावर पडला तिथे तिने तो भाग गिळला तिथे तिला ब्रम्हा पासून गर्भ धारणा झाली ... त्यातून वटसिद्ध नागनाथ यांचा जन्म झाला ...


सर्प आणि मणुष्याचे विर्य यांच्या तुन गर्भधारणा होउ शकते?   सुर्य याने आकाशातून गमन करताना उर्वशी ला पाहिले त्यावेळी ण्याचे स्खलन झाले आणि त्याच्या विर्याचे दोन भाग झाले ..भर्तरीनाथ असे जन्मले होते ...


ब्रम्ह देवाचे विर्य अजूनही रेवा नदीच्या काठी तसेच पडले आहे  त्यातून रेवणसिद्ध नाथ जन्माला आले होते ...


गोरक्षनाथ जेव्हा चिखलाचा पुतळा बणवितात तेव्हा गहिनीनाथ जन्माला येतील ...


असे श्रीकृष्ण नवनारायण यांना तुम्ही कसे जन्माला येणार याबाबत स्पष्टीकरण देऊन त्यात त्यांना संतुष्ट करतो ....संतुष्ट😜😜😜 


वर वाचून काढल्यावर समजेल ...

बौद्ध भिख्खुंचा इतिहास कसा विक्रुत केला आहे 

वैदिकांनी जाणुन बुजून श्रीकृष्णाच्या तोंडून हे अश्लील आणि विक्रुती वदवून दिली आहे त्याने बहुजन जनता खरं समजेल ...


श्री क्रुष्ण खरं तर बहुजन समाजातील मोठी व्यक्ती आहे ....तिचा सुद्धा इतिहास विक्रुत केला आहे ...


किती अश्लीलता

किती विक्रुती

किती खोटे पणा 

किती बदणामी

किती इतिहास आणि सांस्कृतिक घुसखोरी केली होती वैदिकांनी याचं प्रमाण आहे ....


संदर्भ 


श्रीनवनाथ कथासार पान 11 ते 15 ....


आता कळलं असेल बौद्ध धर्म भारतातुन कसा लयास गेला ते....


सत्यशोधक महेश शिंदे

Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम