स्तुप कसा बांधला जात होता

★खूप महत्त्वाची माहिती आहे 

【 स्तुप 】आणि स्तुप बणविण्याची विधी ....बौद्ध काळ 

घुमटाच्या आकाराच्या इमारतीला स्तुप शब्द लावला जात होता .
बौद्ध लोक एखाद्या गोष्टींचे स्मारक म्हणून जी इमारत बांधीत तिला घूमटासारखा आकार असे म्हणून तिला 【स्तुप】 म्हणत ...
या इमारतीत बुद्धाची रक्षा ठेवीत मग तिला चैत्य असे नाव देत ...स्तुपालाच श्रीलंकेत म्हणजे च सिलोन देशातील सिंहली भाषेत दगोबा आसे म्हटलं जाई ...
पाली भाषेत धातु गभ्भ म्हटलं जाई ... संस्कृत मध्ये धातु गर्भ 

स्तुपाचा पाया घालण्यासाठी चा विधी कसा आसतो आणि होता याबद्दल श्रीलंकेच्या [महावंश] नामक बौद्ध ग्रंथात माहिती आली आहे . राजा दुत्तगामिणी याने (सोनवल्ली) नावाचा महास्तुप बांधला होता ... हिकडं सोनवल्ली या नावाकडे विशेष लक्ष्य देण्यासारखे आहे ...
सोनवल्ली   ,सोन्यासारख्या  म्हणजे ज्या आजच्या काळात ही महाग समजलेल्या वस्तू चा वापर करून हा भव्य दिव्य स्तुप आहे असा त्याचा अर्थ होतो ...आपण जसं आजच्या काळात आपल्या एका व्यक्ती च्या वागणूकीला ,त्याच्या वर्तुणीकाला सोन्यासारखा अशी उपमा देतो ...पुढे जाउन त्याठिकाणालासुद्धा तशीच नावं पडतात ... जसं की कान्हेरी लेण्यांच्या आजुबाजुला असणाऱ्या परिसरात अशी नावं सापडतात बोरीवल्ली,कांदिवल्ली,चांदिवल्ली,माथीवल्ली, डोंबवल्ली  यापरिसरात किंवा या शहरांच्या मध्यभागी प्राचीन बौद्ध काळात हमखास भव्य दिव्य स्तुप असतील , यावरून च ईथल्या ठिकाणाला स्तुपावरुनच नावं मिळाली असतील ...विचार करण्याची गोष्ट आहे ....

स्तुप कसा बांधायचा असतो याबद्दल महावंश या ग्रंथात आलेली माहिती ...

🚩प्रथम स्तुप बांधावयाच्या जागी एक स्तंभ उभारुन त्यावर बांधणाऱ्याने आपला उद्देश सविस्तर लिहावयाचा ...आणि स्तुप बांधण्यासाठी सगळी तयारी करायची व नंतर स्तुप बांधल्यानंतर तो स्तंभ तिथून काढायचा .
🚩पायाशी वाटोळे दगड बसवायचे .
🚩त्यावरती लोण्यासारख्या चिकणमाणीचे थर द्यावयाचे ...
🚩त्यावर विटांचा ,लुकणाचा व कुरुंदाच्या दगडाचा थर देऊन लोखंडी जाळ्या ,स्फटिक वगैरे बसवल्यानंतर त्यावर साध्या दगडाचे काम करीत,त्यावर आठ इंचिचे जाडीचे पितळेचे पत्रे लुकणात बसवित .
🚩हे लूकण कपित्थ व्रक्षाचा डिंक म्हणजे बाभळीच्या डिंकाचा आसावा तांबड्या नारळाच्या पाण्यात कालवून केलेले असे .
🚩त्यावर सात इंच जाडीचे चांदीचे पत्रे तिळाच्या तेलात शेंदूर कालवून केलेल्या लुकणात बसविलेले आसत ..
🚩स्तुपाच्या बांधकामाची तयारी झाल्यावर राजाच्या हातून त्याचा पाया घालीत .हा समारंभ मोठ्या थाटाचा असे .उरलेल्या दिवशी बौद्ध भिख्खू व प्रख्यात नागरिक स्तुपाच्या जागी येत . या जागाकडे जाणारे सगळे रस्ते उत्तम श्रुंगारलेले असत . या समारंभासाठी  वैशाली ,उज्जेयनी,श्रावस्ती,काशी, कोशांबी,काश्मीर, यवनदेश,काबूल वगैरे दुरदुरच्या ठिकाणाहून महाथेरो आणि बौद्ध भिख्खू निमंत्रणावरुण येत .
🚩सर्व मंडळी जमल्यानंतर राजाची सवारी तिसऱ्या प्रहरी मोठ्या थाटात लवाजमा सहीत निघत असे .या स्वारीसोबत सुंदर सुंदर नायकिणींचे व नर्तकींचे ताफे असत ...
🚩राजाची स्वारी स्तुपाच्या जागी येऊन पोहचली म्हणजे राजा त्या जागेच्या मध्यभागी आणि स्तुपाच्या चारी कोपऱ्यांना  वस्त्रांचे 1008 ढीग घाली . आणि मध,साखर, लोणी व इतर वस्तू आणून ठेवीत.. मग राजा अभिवंदन करुन सर्वांना पुष्पहार घाली ...
🚩राजा त्या जागेला तीन प्रदक्षिणा करी आणि मग हातात सोनेरी मुलामा केलेला कंपास घेऊन वर्तुळ काढी ...
🚩त्या जागेच्या मध्यभागी राजा आठ सोन्याचे कलश आणि आठ चांदीचे कलश ठेवी आणि त्यांच्या भोवती आठ सोन्याच्या आणि आठ चांदीच्या विटा ठेवी ...आठ च का ? तर आठ म्हणजे च अष्टांगिक मार्ग .....
🚩त्या प्रत्येक विटांच्या भवती कापडाचे 108  तुकडे ठेवून सर्वांच्या भोवती मातीचे आठ घट ठेवीत . मग प्रधान एक विट राजाच्या हातात देई .ती घेऊन राजा ती विट पुष्पांनी सुगंधित केलेल्या लुकणात बसवी ....राजाचे इतर प्रधान ही त्या विटा तशाप्रमाणे बसवीत ...
🚩हा विधी झाल्यानंतर राजा भिक्षुंना व थेरोंना नमस्कार करी ... मग थेरो आणि भिख्खू जय मंगल सुत्ते म्हणून त्याला आशिर्वाद देत ...राजाच्या विनंती वरुन सर्व जण तिथेच सात दिवस राहून नंतर आपापल्या ठिकाणी परत जाई ...
🚩याप्रमाणे राजा गवंडी बोलावून त्याच्या नायकाला पोशाख करून त्यांना तिथे काम करण्यास प्रारंभ करायला सांगत ... स्तुपाचे काम अर्धवट राहु नये म्हणून त्याठिकाणी त्याच्या खर्चासाठी 【साठ हजार क्षपण】 हे एक नाणे प्रत्येक वेशीपाशी पुरुन ठेवी ...
🚩स्तुप तयार झाल्यानंतर त्यात बुद्धाची रक्षा ठेवण्यासाठी सुद्धा एक विधी आसते .
🚩यावेळी राजा आपली स्वारी घेऊन ज्या पात्रात बुद्धाची रक्षा ठेवावयाची आहे ते सुवर्णपात्र डोक्यावर धरून फार मोठ्या समारंभाने रथ,हत्ती, घोडे, चतुरंग सैना ,सरदार मंडळी, पुष्पपात्रे धारण करणाऱ्या स्त्रिया यासह येत असे ... मग महत्वाच्या व्यक्ती ने आणलेल्या  महाथेरो ने आणलेल्या बुद्धाच्या रक्षेपुढे हात जोडून. वंदन करी .आणि नभ्रपणे उभा राही.
🚩त्यानंतर राजा म्हणे की आपण आपले राजवैभव ,संपत्ती सर्व बुद्धाला अर्पण करत असून ते सर्व तो त्या पात्रात घाली ...रत्न,सोने ,चांदी ,अलंकार ,मणी हे सर्व ते तो रक्षेच्या सोनेरी पात्रात घाली ...
🚩त्यानंतर रक्षा असलेले पात्र घेऊन तो स्तुपावर चढी . स्तुपाच्या मध्यभागी रक्षा असलेले पात्र ,सोने ,चांदी ,रत्न ,अलंकार असलेले पात्र स्तुपाच्या मध्यभागी ठेवत असे ...  पात्र ठेवून झाल्यानंतर सुत्ताचा वर्षाव होत  वाद्यांचा गजर होत ... एवढ्या थाटामाटात हा विधी पार पडला जाई ...

स्तुप सध्या तुम्हाला नालासोपारा म्हणजे च मुंबई पश्चिम ला असाच पहायला मिळेल ... सध्या रक्षा आणि इतर वस्तू या पहायला भेटत नाहीत त्या वस्तू संग्रहालयात मिळतात ...

सत्यशोधक महेश शिंदे

Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम